Advertisement

निलज येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त "भरकटलेली पाखरं नाटकाचे" आयोजन

निलज येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त “भरकटलेली पाखरं नाटकाचे” आयोजन

माजी जि. प. सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

ब्रह्मपुरी- तालुक्यातील निलज येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री गणेश दत्त नाट्य रंगभूमी निलजच्या वतीने “भरकटलेली पाखरं” नाटकाचे आयोजन करण्यात आलं होतं. या नाटकाचे उद्घाटक म्हणुन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, उपाध्यक्ष म्हणून अण्णाजी ठाकरे रुई, माजी जि. प. सदस्य प्रा. डॉ. राजेश कांबळे, ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकरजी शेलोकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथजी सॊन्दरकर, हरिदास दोनाडकर, पुंडलिक ठाकरे माजी उपसरपंच निलज, नानाजी मेश्राम, देवचंदभाऊ ठाकरे, ताराचंद पारधी उपसरपंच खरकाडा, प्रफुल ठाकरे सदस्य ग्रा. पं. खरकाडा, हेमंत नाकतोडे, दिगांबर नाकतोडे तं. मु.स. रुई, ज्ञानेश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर बुल्ले उपसरपंच रुई, विलास धोटे धान्य व्यापारी रुई, शंकर कोपुलवार उपसरपंच निलज, मनोहर राहाटे सदस्य ग्रा. पं. निलज, नारायण मेश्राम सदस्य ग्रा. पं. निलज, कल्पना मांढरे सदस्य ग्रा. पं. निलज, शिलाताई सॊन्दरकर सदस्य ग्रा. पं. निलज, जान्हवी पिलारे सदस्य ग्रा. पं. निलज, प्रिया ढोरे सदस्य ग्रा. पं. निलज, माधुरी मांढरे सदस्य ग्रा. पं. निलज, अशोक भुते यावेळी उपस्थित होते.

या नाटकाच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, नाटक हा समाजाचा आरसा आहे, नाटकातून लोकजीवन प्रतिबिंबित होते. कार्तिक काल्याच्या निमित्ताने निलज या ठिकाणी “भरकटलेली पाखरं” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे आजची युवापिढी उद्दीष्टहीन होऊन भरकटलेली आहे. तिला एक निश्चित दिशा देण्याची गरज आहे. या नाटकाच्या शीर्षकावरून अशीच एक कहाणी आपल्या समोर येणार आहे. त्यावरून आजच्या युवापिढीने बोध घेऊन आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी. असे प्रतिपादन नाटकाचे उदघाटक प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केले.
श्री गणेश दत्त नाट्य रंगभूमी निलजच्या वतीने रात्री ८:00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी “भरकटलेली पाखरं” नाटकाचा आस्वाद घेतला. नाटकाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मॅनेजर, स्टेज मॅनेजर तथा गणेश दत्त नाट्य रंगभूमी निलजच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या