कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. रश्मिताई श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते व पंचायत समिति उपसभापति सौ.करुणाताई भोवते आणि ग्राम पंचायत सरपंच, मा.बलवंत पडोळे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी जि.प.माजी अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे आणि सरपंच बलवंत पडोळे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य , अधिकार्यांनी , कर्मचाऱ्यांनी , व नागरिकांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कांद्री ग्रामपंचायत सदस्य धनराज कारेमोरे , चंद्रशेखर बावनकुले , बैशाखू जनबंधु , महेश झोडावने , राहुल टेकाम , सदस्या आशाताई कानोजे , राजु देशमुख , महेंद्र भूरे , प्रल्हाद वाघमारे , गणेश सरोदे , अभय जांबुतकर , गणेश आकरे , सुनील प्रजापति , कृष्णा वरखडे , पंकज मस्के सह आदि कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या