Advertisement

कायदेविषयक जनजागृती शिबीर व समारोपिय कार्यक्रम संपन्न

कायदेविषयक जनजागृती शिबीर व समारोपिय कार्यक्रम संपन्न

ब्रम्हपुरी:- तालुका विधी सेवा समिती ब्रम्हपुरी च्या विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर ग्रा. प. उदापूर येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. गावोगावी जवळपास पंधरा दिवस कार्यक्रम घेऊन कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. त्या अनुषंगाने ग्रा. प. उदापूर येथे कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून लाभलेले ऍड. मैंद साहेब यांनी पास्को कायद्याबद्दल विशेष व विस्तृत माहिती दिली. तसेच ऍड. एस. के. रामटेके यांनी आरोपी चे काय अधिकार असतात त्यावर विशेष मार्गदर्शन केले. आणि ऍड खोब्रागडे यांनी सायबर क्राईम यावर विशेष भर दिला, तर ऍड. बोरकर मॅडम यांनी मध्यस्ती चे काय महत्व हा विषय उपस्थितांना समजावून सांगितले.
प्रस्तुत कार्यक्रमांस ब्रम्हपुरी न्यायालयीन वरिष्ठ लिपिक हिरकण्या खोब्रागडे मॅडम, कनिष्ठ लिपिक प्रशांत मेश्राम, मेजर सुदेश कुमरे, मेजर नाजूक चहांदे,प्रियंका डोंगरे,प्रमोद पदलमवार शिपाई हजर होते. तसेच उपसरपंच योगेश तूपट, ग्रामसेवक उत्तम बावनथडे, ग्रा. प. सदस्य प्रेमीला नवघडे, अरुण करमणकर, वैषाली बुल्ले, सुरेखा नाकतोडे व उपस्थित गावकरी यांनी खास उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या