Advertisement

आर्थिक दुर्बल असलेल्या व्यक्तींनी अर्ज केल्यास मोफत सेवा मिळण्याची व्यवस्था अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर

आर्थिक दुर्बल असलेल्या व्यक्तींनी अर्ज केल्यास मोफत सेवा मिळण्याची व्यवस्था अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर

वडगाव मावळ(पुणे):श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने महिला विषयक कायदे या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर बोलत असताना विविध बाबी सांगितल्या त्यात महिलांना न्यायालयात मोफत सुविधा दिल्या जातात तसेच आर्थिक दुर्बल असलेल्या व्यक्तींना ही अर्ज केल्यावर मोफत सेवा दिल्या जातात. अन्याय झालेल्या व्यक्तींनी न्यायालयात धाव घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अमित अगरवाल म्हणाले युवा पिढी भरकटत असल्याने समाजाचे स्वास्थ्य बिघडते. दुचाकी चालविताना सावध राहा. युवा पिढी मित्रांसोबत पार्टी करताना अनेकजण व्यसनी होत आहे. विद्यार्थी जीवन सावधपणे जगणे आवश्यक आहे. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश चिंतेचा विषय आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा कष्टाने मार्गाने जावा. गुन्हेगारीचा ठप्पा लागला की सरकारी नोकरी लागत नाही. युवकांसाठी संयम बाळगा, व्यसनापासून दूर राहा, रागावर नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणें विधी सेवा समितीच्या वतीने कायद्याची जनजागृती केली जाते.
दिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी. एस. पाटील म्हणाल्या सोशल मीडियाचा वापर ज्ञान मिळविण्यासाठी करा पण सोशल मीडियाचे व्यसन लावून घेऊ नका. महिलांचं संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे आहेत. त्या कायद्याची जनजागृती करणे काळाची गरज आहे. सोशल मीडियाचे फायदे आहेत तसेच नुकसान पण आहेत. आयुष्यात शिस्त आवश्यक आहे.

 

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.राजेंद्र गाडे पाटील म्हणाले अनोळखी व्यक्तींना केलेली मदत महागात पडू शकते जस की अनोळखी व्यक्तीला ए टी एम. मधून पैसे काढून देणे महागात पडू शकते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अशोक बाफना म्हणाले मनातील भीती कमी केल्यावर प्रश्न सहज सुटतील. सोशल मीडियाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अमित अगरवाल, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी. एस. पाटील, वडगाव वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.राजेंद्र गाडे पाटील,सचिव ॲड. हेमंत वाडेकर,

ॲड.सुधा शिंदे, ॲड. रमेश दाभाडे,ॲड. संजय शिंदे, ॲड.विश्वनाथ जाधव.कला वाणिज्य व बी.बी. ए. महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा.महादेव वाघमारे,डॉ.प्रा.शितल दुर्गाडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शितल शिंदे,प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा.गजानन वडुरकर,डॉ. प्रा.जया धावारे, प्रा. अनिल कोद्रे, प्रा.योगेश जाधव, प्रा.सुखदेव जाधव, ,प्रा.स्वप्नील ठोकळे, प्रा.संतोष शिंदे,प्रा.अशोक कोकळे,प्रा. मोहिनी ठाकर, ग्रंथपाल प्रा.सुप्रिया पाटोळे, अक्षय अवताडे सर व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शितल शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी केले. आभार प्राचार्य अशोक गायकवाड यांनी केले.

 

मावळ तालुका (पुणे) प्रतिनिधि सुखदेव जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या