Advertisement

हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा भाजीपाला , बस स्टैंड , दुकानदार करिता उपलब्ध करुन देण्याची मागणी

हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा भाजीपाला , बस स्टैंड , दुकानदार करिता उपलब्ध करुन देण्याची मागणी

स्थानिक आणि फुटपाथ दुकानदारांचे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन

कन्हान – कन्हान – पिपरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद पडलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनी विकल्या नंतर त्या जागेवर वाढीव दराने शहर आणि सिटी प्रमाणे विक्री करीत असल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने दुकांनदारांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांची भेट घेऊन , चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन बंद पडलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनी च्या जागेवर मार्केट यार्ड , हाॅकर्स झोन , साप्ताहिक व गुजरी बाजार , भाजीपाला विक्रेता दुकानदार , बस स्टैंड करिता जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

निवेदनात सांगितले कि मौजा कन्हान पिपरी 406015 येथील बंद पडलेल्या औद्योगिक कंपनी, बुक बॉन्ड किमी इतर हिंदुस्तान लिकर कि सी. एण्णी च्या जागा ओसाड झालेल्या अवस्थेत असल्याने दिनांक 5112018 रोजी कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ च्या पदाधिकार्यांनी व दुकानदारांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनी च्या जागेवर मार्केट यार्ड , हाॅकर्स झोन , साप्ताहिक व गुजरी बाजार , भाजीपाला विक्रेता दुकानदार , बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासा करिता उपयोगात आणण्याची मागणी केली होती . परंतु नगर परिषद प्रशासनाने सदर विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा विकल्या गेल्याने शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाले आहे .

मागील कित्येक वर्षापासुन राष्ट्रीय महामार्गा वर फुटपाथ , गुजरी आणि साप्ताहिक बाजार ची दुकाने लागत आहे . विविध संघटने द्वारे अनेका नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन ही प्रशासनाने हिंदुस्तान लिव्हर कंपनी विकत घेण्या करिता शासनाला पत्र व्यवहार सुद्धा न केल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा बाहेरील काही लोकांनी विकत घेतल्याने समोर फुटपाथ वर बसलेले दुकानदार हटविन्याची चर्चा शहरात सुरु आहे . यातच आज ही साप्ताहिक व गुजरी बाजार रस्त्यावर भरत असुन बस स्टैंड ची व्यवस्था नसुन याची व्यवस्था कुठे होईल असा प्रश्न निर्माण झाला असुन सध्या च्या परिस्थिति मध्ये हिंन्दुस्तान लिव्हर कंपनी ची जागा ज्यांनी विकत घेतली त्या जागेवर वाढीव दराने शहराप्रमाणे , स्मार्ट सिटीप्रमाणे प्लाॅट विक्री करीत असुन संबंधीत हया ले-आउट मधील संबंधीत दस्तऐवज कायदेशीर चौकशी करुन त्यावर रोकथाम लावावे . आणि त्या जागेवर मार्केट यार्ड, हॉकर्स झोन , चिल्लर , ठोक भाजीपाला विक्रेता दुकानदार , साप्ताहिक व गुजरी बाजार बस स्टँन्ड आदि शहराचा सर्वांगीन विकासा करिता जागा उपयोगात आणावी अशी मागणी दुकानदार बांधवांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांना निवेदन देऊन केली आहे . जर मागणी पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

या प्रसंगी कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी , सचिव प्रशांत मसार , प्रदीप गायकवाड , सचिन गजभिए , नितिन रंगारी , ऋषभ बावनकर , चिराल वैध , अमोल मोहबे , गजानन कपाटे , रणवीर पात्रे , जावेद सैयद , शिवशंकर हालमारे , सह आदि दुकानदार बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या