Advertisement

तोरगाव(खुर्द) येथील मुरूम तस्करीत अधिकाऱ्यांची संशयास्पद कारवाई

तोरगाव(खुर्द) येथील मुरूम तस्करीत अधिकाऱ्यांची संशयास्पद कारवाई

राहुल श्रीराम भोयर ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील तोरगाव(खुर्द) येथील सरपंच शरद अलोने यांनी गावातील 12-13 ट्रॅकरने जि. प.शाळेच्या पटांगणात टाकण्याकरिता सकाळी आठ वाजता पासून भरदिवसा तोरगाव(बुज) येथील गट नंबर ४२६ मधून मुरूम नेत होते. त्यावेळी त्यांनी गावातील लोकांना सांगितले की आपल्या कडे परवानगी घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची लेखी परवानगी नव्हती. तोरगाव (बुज.) येथील सरपंच संजय राऊत यांना आपल्या गावातील मुरूम तस्करी होत असल्याची माहिती
काही गावकऱ्यांनी दिली. माहिती मिळताच संजय राऊत हे घटनास्थळी दाखल झाले व सरपंच शरद अलोने यांना विचारले की आपण आमच्या हद्दीतील मुरूम का नेत आहात. तर सरपंच शरद अलोने यांनी तहसीलदार यांच्या परवानगीनेच मुरुम नेत असल्याचे सांगितले असल्याचे समजते. राऊत यांनी लगेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता महसूल कर्मचारी उपस्थित झाले. त्यांनी मुरूम उत्खनन थांबविले मात्र कसलीही ठोस कारवाही करण्यात आली नसल्याने अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून गावात याबाबत बोलले जात आहे. तर तोरगाव येथील सरपंचाच्या खोटारडेपणा मुळे गावातील जनतेचा विश्वास उडाला असल्याचेही बोलले जात आहे.

( मुरूम तस्करीतील ट्रॅक्टर मंडळ अधिकारी यांनी तहसिल कार्यालयात जमा का केले नाही?
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने विध्यार्थ्यांना शाळेत पाण्यातून, चिखलातून जावे लागते त्यामुळे
मंडळ अधिकारी यांना शाळेत मुरूम टाकायचे असल्याने तोंडी परवानगी मागितली असता तहसिलदार यांची विचारणा करा अशी माहिती मंडळ अधिकारी यांनी दिली त्यामुळे
तहसीलदार यांना गावातील लोकांसोबत जावून मूरुमाची मागणी केली असता त्यांनी तोंडी परवानगी दिली. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरगाव येथे मुरूम टाकण्यात आले. मात्र मुरूम उत्खनन सुरू असताना मंडळ अधिकारी तेथे आले व तहसीलदार यांनी पाठवले असल्याचे सांगून १० हजार अधिक १० हजार असे एकूण २० हजार रुपये घेतले असल्याचे सरपंच अलोने यांनी सांगीतले.
वास्तविक मुरूम तस्करी सुरू होती तर यावेळी मंडळ अधिकारी यांनी सर्व तस्करीतील ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा का केले नाही? या तस्करीवर कार्यवाही करायला पाहिजे मात्र मंडळ अधिकारी यांनी असे का केले नाही? कसलीही कार्यवाही न करता त्यांनी पैसे का घेतले ? असे मोठे प्रश्न तालुक्यातील जनसामान्यामध्ये निर्माण झालेले आहे. यामागील मंडळ अधिकाऱ्यांची कर्तव्य काय? असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

( तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी
तोरगाव- बेलगाव सह ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरूम व वाळूची संपूर्णतः बंदी असतानाही या गौण खनिजाची तस्करी सूरू असून तालुक्यांतील संबंधीत विभागांतील अधिकाऱ्यांना दिसत नाही का? दिसतो तर तस्करी कशी सुरू आहे.? यात अधिकारी कर्मचाऱ्यानच्याच सहभाग तर नाही ना? ही तस्करी कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? असे एक नाहि तर अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेत चर्चिल्या जात आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या