कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजली
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत . समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या १० जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये नागरिकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचसोबत बॉम्ब स्फोट सुद्धा घडवून आणला होता. इतिहासातील सर्वाधिक भीषण आणि भयावह अशा या दहशतवादी हल्ल्यामुळे आज ही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या हल्ल्यात १६० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला असुन ३०० हून अधिक जण जख्मी झाले होते. या पार्श्वभूमीवर कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते शहिद स्मारका वर पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात केली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी शहिद स्मारका वर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या निष्पाप नागरिकांना व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे , हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , भुषण खंते , कृणाल सिंग राजपुत , योगराज आकरे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .


0 टिप्पण्या