कन्हान येथे तीन दिवसीय सांस्कृतिक मंडई चे आयोजन
मंडई समिति ची कार्यकारणी जाहिर , चिंटु वाकुडकर यांची अध्यक्ष पदी निवड
कन्हान – कन्हान शहरात जय मानवता बहुउद्देशीय संस्था द्वारे दिवाळी महोत्सव निमित्य तीन दिवसीय मंडई मेले चे आयोजन करण्यात आले असुन शनिवार ला आयोजित एका बैठकी मध्ये मंडई समिति ची कार्यकारणी जाहिर करुन अध्यक्ष पदी चिंटु वाकुडकर व सचिव पदी सोमेश शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जय मानवता बहुउद्देशीय संस्था द्वारे दिवाळी महोत्सव निमित्य शहरात सांस्कृतिक मंडई मेले चे आयोजन करण्यात आले आहे . या संबंधित संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णकुमार अग्रवाल यांच्या निवास स्थानी संस्था अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
या बैठकी मध्ये चर्चा करुन सर्वानुमते ११ , १२ , १३ नोव्हेंबर असे तीन दिवसीय सांस्कृतिक मंडई मेले चे आयोजन करण्यात आले आहे . या सांस्कृतिक मंडई समिति ची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन सर्वानुमते अध्यक्ष पदी चिंटु वाकुडकर , उपाध्यक्ष पदी अनिल ठाकरे , सचिव पदी सोमेश शेंडे , कोषाध्यक्ष पदी अजय चव्हान , समशेर पुरवले , सदस्य पदी प्रकाश तिवारी , शाहरुख खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
या प्रसंगी मनिषा चिखले , नितु तिवारी , ममता दास , वैशाली थोरात , जोशिला ऊके , लता लुंढेरे , आदि उपस्थित होते .
या बैठकीचे सुत्र संचालन आणि आभार जय मानवता बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांनी केले .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर


0 टिप्पण्या