Advertisement

सिहोरा कन्हान नदी पात्रातुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले

सिहोरा कन्हान नदी पात्रातुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले

कारवाई दरम्यान एक ट्रॅक्टर , ट्राॅली आणि एक ब्रास रेती सह एकुण ९ ,०५ , ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या सिहोरा कन्हान नदी पात्रातुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडुन त्याच्या जवळुन एक ट्रॅक्टर , ट्राॅली आणि एक ब्रास रेती सह एकुण ९ ,०५ , ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दि. २ नोव्हेंबर ला रात्री १ ते १:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस नापोशि मंगेश सोनटक्के , पोशि गणपत सायरे सह आदि पोलीस कर्मचारी आपल्या हद्दी मध्ये पेट्रोलिंग ड्यूटी करीत असतांना गुप्त बातमी दाराकडुन खबर मिळाली की , सिहोरा गावात असलेल्या कन्हान नदीचा पात्रातून ट्रॅक्टरचा साह्याने अवैध रित्या रेतीची चोरी होत आहे . अशा मिळालेल्या विश्वसनीय खबरे वरून कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचली असता पोलीसांना पाहून सदर ट्रॅक्टर चा चालक हा त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर सोडून पळून गेला .

कन्हान पोलीसांनी सदर ट्रॅक्टर ची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टर चा मुंडा विना क्रमांका चा आढळुन आला असुन पोलीसांना घटनास्थळा वर ट्रॅक्टर क्रमांक. एम एच ४० बीई ११२७ किंमत ५.००,०००/- रु , ट्रॉली क्रमांक एम एच ४०४३५१ किंमत ४,००,०००/- रु , व एक बॉस रेती किंमत ५०००/- रु. असा
एकुण ९ ,०५ ,०००/- रु. चा मुद्देमाल पंचासमक्ष मिळून आल्याने कन्हान पोलीसांनी आपल्या ताब्यात घेऊन सरकार तर्फे फिर्यादी पोशि गणपत सायरे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी १) नरेंद्र रामाजी बेले वय ४९ वर्ष रा.रामनगर कन्हान , २) अशोक रावजी भालावी वय २९ रा.बोरडा निमखेडा यांचा विरुद्ध अप.क्र ६२२/२०२२ कलम ३७९ , १०९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन दोन आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एसआई गणेश पाल , विरेंद्र चौधरी हे करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या