Advertisement

कन्हान ला आज ११४ आदिवासी गोवारी शहिद श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान ला आज ११४ आदिवासी गोवारी शहिद श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र पारशिवनी तालुका कन्हान शहर व्दारे गोवारी शहिद स्मारक तारसा रोड, कन्हान ला नागपुर जिल्हयाच्या वतीने गोवारी शहिद स्मारक झिरो मॉईल नागपुर येथे समाज बांधव आज ११४ आदिवासी गोवारी शहिदाना कार्यक्रमास श्रध्दांजली अर्पण करणार आहे .

गोवारी जमातीला अनुसुचित जमातीचे पुर्ववत सवलती देऊन अनुसुचित जमातीच्या यादी मध्ये समाविष्ट करावे ही आपल्या समाजाची मुख्य मागणी आहे. परंतु काँग्रेस आणि बीजेपी सरकारने देशावर ७० वर्ष राज्य करूनही आज पर्यंत समजाला मुळ सवलती पासुन वंचित ठेवले. १९५६ चे अनुसुचित जातीजमाती (संशोधन) बिला मध्ये गोवारी ऐवजी गोंड गोवारी अशी नोंद झाली . त्यामुळे गोवारी जमात अनुसुचित जमातीच्या सवलती पासुन वंचित झाली. ही बाब लक्षात आणुन देण्याकरीता राज्य शासन, केंद्र शासना ने वेळोवेळी नियुक्ती केलेले आयोग यांचे निदर्शनास आणुन देण्याचे कार्य समाजाच्या संघटनांनी केलेले आहे. म्हणुन त्याचा परिणाम असा झाला की, १४ ऑ गस्ट २०१८ रोजी मुंबई हाईकोर्ट च्या नागपुर खंडपिठाने आपल्या बाजुने न्याय दिला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने गोवारी समाजाच्या विरोधात जाऊन एस.एल.पी. दाखल केली.

त्याच्या परिणाम १८ डिसेंबर २०२० ला मा. सुप्रिम कोर्टाने गोवारी समा जाच्या विरुध्द निर्णय दिला. तरीही गोवारी समाजाचा संघर्ष थांबलेला नाही. प्रमुख संघटनेनी पुर्नविचार या चिका दाखल करून कोर्टाला न्याय मागीतलेला आहे. सध्या पुर्नविचार याचिका कोर्टात दाखल आहे. आपण २३ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या हत्याकांडात शहि द झालेल्या ११४ गोवारी बांधवांना श्रध्दांजली देण्या करीता एकत्र होत असतो. ह्या दिवसाचे औचित्त साधु न आपण आपली संस्कृती आणि एकता दाखविण्या करीता सर्वांनी बुधवार (दि.२३) नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ९ ते ११ पर्यंत गोवारी शहिद स्मारक तारसा रोड कन्हान येथे सामाजिक कार्यकर्ते मा. भगवान भाऊ भोंडे व मा. प्रकाश भाऊ सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर गोवारी शहिद स्मारक झिरो मॉईल नागपुर येथे श्री नारायणजी कावरे जिल्हा प्रमुख नागपुर ग्रामिण यांच्या प्रमुख उपस्थित ११४ गोवारी शहीद बांधवाना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात येईल. यास्तव मोठया संख्येने समाज बांधवानी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन श्री आनंद सहारे कार्यकारणी अध्यक्ष, श्री क्रिष्णाजी सायरे सल्लाहगार, विनीत- श्री नेवालाल सहारे तालुका अध्यक्ष यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या