धर्मराज प्राथमिक शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी
सशक्त भारत निर्माणासाठी प्रत्येक बालकांनी चांगले शिक्षण व संस्कार आत्मसात करुन चांगला नागरिक बनावे – शिक्षक
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान -शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील धर्मराज शैक्षणिक परिसरात धर्मराज प्राथमिक शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नरेंद्र कडवे , प्रमुख अतिथी मा. भिमराव शिंदे मेश्राम , पर्यवेक्षक मा.सुरेंद्र मेश्राम , मुख्याध्यापक मा. खिमेश बढिये आदि उपस्थित होते . यावेळी प्रथम पाहुण्यांच्या हस्ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी सौ सरीता बावनकुळे यांनी “बच्चे मन के सच्चे” हे गीत सादर करुन बालक दिना निमित्त बालकां मध्ये उत्साह भरला . यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करुन सशक्त भारत निर्माणासाठी प्रत्येक बालकांनी चांगले शिक्षण व संस्कार आत्मसात करुन चांगला नागरिक बनावे , असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक मा.खिमेश बढिये यांनी तर आभार मा.प्रशांत घरत यांनी मानले . सुंदर फलकलेखन मा.अमीत मेंघरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कु शारदा समरीत, कु हर्षकला चौधरी, कु पूजा धांडे, कु प्रिती सुरजबंसी, कु कांचन बावनकुळे, सौ वैशाली कोहळे,मा.दिनेश ढगे, मा.सतीश राऊत,मा.तेजराम गवळी, कु. कोकीळा सेलोकर, सौ छाया कुरुटकर सह आदि ने सहकार्य केले .


0 टिप्पण्या