Advertisement

माॅयल कामगारांच्या प्रश्नांसाठी आरएमएमएस चा पुढाकार

माॅयल कामगारांच्या प्रश्नांसाठी आर.एम.एम.एस. चा पुढाकार

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – मॉयल कामगाराच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मॅगनीज मजदूर संघाच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानी मॉयल सीएमडी उषा सिंग सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली असून लवकरच प्रश्नावर तोडगा काढण्याचे मॉयल अधिकाऱ्यांनी आश्वास्त केले आहे .

यावेळी उत्पादन व योजना निदेशक एम. अब्दुला , वाणिज्य निदेशक पी.व्ही. पटनायक , पर्सनल जीएम टी. दास , संघटनेचे जनरल सेक्रेटरी पुरणदास तांडेकर व उपाध्यक्ष सतीश बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होते .

कामगारांना नवीन वेतन करारानुसार मासिक एरियस देयकाची संगणकीकृत स्टेस्टमेंट कॉपी देण्यात यावी , वेज रिव्हिजन कराराला संशोधित करण्यात यावे आणि समस्त कामगार संघटनेला विश्वासात घेतले पाहिजे तसेच अनुकंपा नियुक्ती मध्ये शिक्षणाच्या अटीला शिथिल करण्यात यावे . मा. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशाच्या अधीन राहून आवश्यक पर्याप्त वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयाने मेडिकल अनफिट प्रमाणवर त्या कामगाराला अनफिट आणि त्यांच्या जागेवर त्याचा कुटुंबाच्या सदस्याची नियुक्ती करावी . अश्या विषयावर मॉयल अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली .

यावेळी संघ उपाध्यक्ष फिरोज खान , कदीर खान , श्रीराम सूर्यवंशी , संजय गेडाम , सुधीर शिव , शेख बशीर , सतीश डोंगरीवाल , कैलास गेडाम , नामदेव भारती सह आदि कामगार पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या