तालुकास्तरिय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कामठी:- देवरी स्थानिक सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरिय अंडर १७ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर तालुकास्तरिय अंडर १७ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील रोमांचक फायनल मॅचमध्ये सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल च्या चमूने मनोहरभाई पटेल हायस्कूल विरुद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ११ गुणांची आघाडी घेत विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविल्याबद्दल सी. एस. इंग्लिश पब्लिक स्कूल च्या चमूचे श्री. झामसिंगजी येरणे, अध्यक्ष कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी, श्री. अनिलकुमार येरणे, सचिव, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी, छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या