Advertisement

आदर्श हायस्कुल कन्हान येथे विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न

आदर्श हायस्कुल कन्हान येथे विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम थाटात संपन्न

विद्यार्थांनी आपल्या जीवनात विज्ञान निष्ठा बागळणे अतिशय आवश्यक आहे – मान्यवर

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातील आदर्श हायस्कुल येथे विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करुन मान्यवरांनी विद्यार्थांना आपल्या जीवनात विज्ञान निष्ठा बागळणे अतिशय महत्वाचे आहे असे आव्हाहन केले .

शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर ला आदर्श हायस्कुल कन्हान येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ पुष्पा आर. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके व पर्यवेक्षक तसेच विज्ञान शिक्षक श्री ज्ञानप्रकाश यादव , आदर्श हायस्कुल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सी.एन.मेश्राम , प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता देशमुख व संस्थेचे सचिव भरत सावळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे प्रदर्शनीचे उद्घाटन बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ विशाखा ठमके यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिभमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात विज्ञान निष्ठा बाळगणे अतिशय आवश्यक आहे असे आव्हाहन केले असुन सदर विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले .

विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमात वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे उत्कृष्ठ प्रदर्शन सादर करण्यात केले असुन प्रदर्शनीचे आयोजन शाळेचे शिक्षक एस.एस. सोलंकी , रेणूका वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले असुन प्रदर्शनीला उपस्थितां कडून उत्कृष्ठ प्रशंसा प्राप्त झाली असुन विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम थाटात संपन्न झाला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या