Advertisement

कन्हान पिपरी गाडेघाट रोड शेत शिवारात मृत अवस्थेत बिबट मिळुन आल्याने खळखळ

कन्हान पिपरी गाडेघाट रोड शेत शिवारात मृत अवस्थेत बिबट मिळुन आल्याने खळखळ

वनविभाग च्या अधिकार्यांनी घटनास्थळी चौकशी आणि पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविले , पुढील तपास सुरु

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी जुनी कामठी – गाडेघाट रोड वर परमानंद शेंडे यांचा शेतात मृत अवस्थेत सहा वर्षाचा बिबट मिळुन आल्याने एकच खळखळ उडाली होती .

सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर ला सकाळ च्या सुमारास परमानंद शेंडे यांचा शेतात काम करणाऱ्या महिला आपल्या कामावर गेले असता त्यांना मृत अवस्थेत बिबट आढळुन आल्याने काही वेळे करिता त्यांची घाबरगुंडी उडाली होती . त्यानंतर परिसरात घटनेची माहिती आगी सारखी पसरली असता नागरिकांनी घटनास्थळा वर प्रचंड गर्दी केली होती .

सदर घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना मिळताच रामटेक वनक्षेत्र अधिकारी ए.बी भगत आणि वनविभागच्या पथकांने घटनास्थळी भेट देऊन मौका पाहणी करुन पंचनामा नोंदविला असुन मृत बिबट हा नर असुन अंदाजे सहा वर्षांचा होता . तसेच सहाय्यक वन संरक्षक रामटेक हरवीर सिंह भावसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . मृत बिबटचे सर्व अवयव साबुत असुन घटनेची माहिती उपवनसंरक्षक नागपुर वन विभागाचे डॉक्टर भारत सिंह हाडा यांना देण्यात आली असुन वन विभागाच्या पथकाने आजुबाजुचा संपुर्ण परिसर पायी फिरून पाहणी केली . परंतु कुठलेही संदिग्ध मिळुन न आल्याने सदर प्रकरणी वन गुन्हा क्र. ०४, ७७२११९, २७६ अन्वये नोंद करण्यात आला असुन मृत बिबट उत्तरी तपासणी करिता ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर सेमिनरी हिल्स नागपूर येथे नेण्यात आले होते .

लॅबोरेटरी मध्ये फॉरेन्सिक तपासणी करिता पाठविणे करिता मृत बिबटचे नमुने घेण्यात आले असुन शवविच्छेदन डॉक्टर सुजित कोलंगत डब्ल्यू आर टी सी गोरेवाडा , डॉक्टर विनोद शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर , डॉक्टर गौतम भोजने , डॉक्टर सुदर्शन काकडे पशुवैद्यकीय अधिकारी ट्रांजिस्ट ट्रीट मेंट सेंटर नागपूर व त्यांचे चमुच्या नेतृत्वात करण्यात आले . त्यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे निर्देशानुसार प्रतिनिधी कुंदन हाते , गिरीश नाखले , हरवीर सिंह , ए बी भगत , ए सी दिग्रसे क्षेत्र सहाय्यक पटगोवरी , पी आर झारखंडे कन्हान वनरक्षक , एस जे टेकाम वनरक्षक आदी हजर होते.

सदरची कार्यवाही डॉक्टर भारत सिंह हाडा उपवनसरक्षक नागपूर, वन विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पुढील तपास श्री ए सी दिग्रस क्षेत्र सहाय्यक पटगोवारी हे करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या