Advertisement

सर नेस वाडिया फाउंडेशनचा मदतीचा हात पुढे

सर नेस वाडिया फाउंडेशनचा मदतीचा हात पुढे

मुरबाड :- मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले कोंबळपाडा येथे उद्घाटन सोहळा संपन्न
वाल्हिवरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील कोंबळपाडा या गावात सरनेस वाडिया या फाउंडेशनच्या मदतीने व ग्रामपंचायत वाल्हिवरे यांच्या सहकार्याने गावांमध्ये पाण्याची समस्या व अंगणवाडी नूतनीकरण करण्याचे काम करण्यात आले.
कोंभळपाडा ह्या गावात खूप वर्षांपासून पाणी टंचाई ला नागरिकांना तोंड द्यावे लागत असे गावातील महिला पाणी आणण्यासाठी काही अंतरावर असलेल्या नदीच्या पत्रातून डोक्यावर हंडे भरून कसरतीचे काम करत होते ह्याच समस्येला लक्षात घेऊन आज सर नेस वाडीया फाउंडेशन व ग्रामपंचायत वाल्हीवरे याच्या सयुक्तरित्या राबवलेला सौर ऊर्जा आधारित योजना गावात राबविण्यात आली त्यामुळे गावात खूप वर्षांनी पाणी आल्याने गावातील नागरिक हे अनंदिमय झाले आहेत.

त्यामुळे पूर्ण भागातून सर नेस वाडीया फाउंडेशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे लोकांच्या समस्येला लक्षात घेऊन आज ही संस्था ह्या भागात काम करत आहे,तसेच गावातील अंगणवाडी ही सुध्दा पूर्णपणे मोडकळीस आल्याने ह्या संस्थेच्या मध्यांतून नूतनीकरणाचे काम करण्यात आले त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणासाठी नवीन वाटचाल निर्माण झाली आहे. ह्या दोन्ही कामाचे आज उद्घाटन करण्यात आहे ह्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर नेस वाडीया फाउंडेशन चे मान्यवर श्री .धर्मेश गोयल,श्रीमती. कुशाला शेट्टी,करिश्मा कथोरीया,सागर सोनवणे,प्रमोद भला व ग्रामपंचायत वाल्हीवरे येथील ग्रामसेवक श्री.प्रकाश कोळी कांता रमेश खाकर(सरपंच) नितीन असवले (उपसरपंच)
संतोष लोहकरे(सदस्य) विठ्ठल उघडे (सदस्य) चंद्रभागा इरणक (अंगणवाडी सेविक)
व गावातील नागरिक विठ्ठल घोडे, भास्कर भला सोनू पोकळा व आधी गावातील मान्यवर याच्या उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

किरण कारभळ (मुरबाड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या