Advertisement

आमडी-हिवरी ग्रा.प.मध्ये विविध उपक्रम व कार्यक्रमाला यश: सौ शुभांगी राजू भोस्कर

आमडी-हिवरी ग्रा.प.मध्ये विविध उपक्रम व कार्यक्रमाला यश: सौ शुभांगी राजू भोस्कर

आमडी-हिवरी:- मागील चार वर्षाचा सतत प्रयत्नाला मिळाले यश. आमडी गट ग्रामपंचायत अंतर्गत आमडी गावाकरीता एक करोड रुपयाची जलजिवन मिशन अंतर्गत अन्सी हजार लिटर नवीन पाण्याची टाकी, नवीन दोन बोर पंप,नविन वाढिव पाईप लाईन मंजुर झाली.

दिनांक १६/११/२०२२ ला मंजुर कामाची जागेची (लोकेशन) ची पाहणी करण्या करण्याकरीता पारशिवनी पाणीपुर्वठा विभाग अधिकारी उमाले साहेब, माथनकर मॅडम, ठेकेदार (एजन्सी) यांनी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर सह ठिकाणच्या जागेची, बोर चा जागेची व वढीव पाईप लाईन चा जागेची पाहाणी केली.

तसेच आमडी गट  ग्रामपंचायत अंतर्गत हिवरी गावा मध्ये सत्तर लक्ष रूपयाची जलचिवन मिशन अंतर्गत पाण्याची नवीन टाकी,नवीन विहीर,नवीन वाढिव पाईप लाईन मंजुर झाली.हिवरी गावात जाऊन जागेची पाहणी करतांना अधिकारी सरपंच उपस्थीत पाणीपुर्वठा कर्मचारी.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान  आमचा गाव आमचा विकास उपक्रम अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी चा वतीने ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्या करीता गणस्तरीय प्रक्षीशण. दिनांका १६/११/२०२२ ला केरडी गावा अंतर्गत जिल्हा परीषद शाळे मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी जाधव साहेब, विस्तार अधिकारी नाईक साहेब,सचीव,सरपंच, आरोग्य अधिकारी,आशा वर्कर,अंगनवाडी शिक्षीका,जिल्हा परिषद शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी सर्व प्रमुख्याने उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या