Advertisement

डुमरी प्लाय ओवर वर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ची उडान पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडक

डुमरी प्लाय ओवर वर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ची उडान पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडक

भीषण अपघातात कैलास मुन यांचा मुत्यु

फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील डुमरी प्लाय ओवर वर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रोडावरील कठड्याला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात कैलास मुन यांच्या मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दि ११ नोव्हेंबर ला सकाळी ८३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी राजेंद्र धाडुजी मेश्राम आणि इतर सर्व कर्मचारी हे नागपुर वरुन रामटेक करीता जात असतांना ९४० वाजता च्या दरम्यान डुमरी प्लाय ओवर वर बस चालकाचे अचानक त्याचे बस वरुन नियंत्रण सुटल्याने बस क्रमांक एम एच ४० सीडी ०६९२ ही रोडवरील कठडयाला जावुन धडकल्याने झालेल्या अपघातात बसचे गेट उघडले व मध्ये बसलेले कैलास विनायक मुन वय 57 वर्ष रा. ओमकार नगर नागपुर हे बसच्या खाली कठडयावर पडल्याने त्यांच्या छातीला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारा करीता खाजगी वाहनाने खाजगी रुग्णालय रामटेक येथे दाखल केले तेथे जख्मीचा प्रथम उपचार करुन किमया हॉस्पीटल येथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारा करीता मेडीकल कॉलेज नागपुर येथे रेफर केल्याने त्यांना मेडीकल कॉलेज नागपुर येथे आकस्मीक विभागात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी राजेंद्र धाडुजी मेश्राम यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला बस चालका विरुद्ध अप क्रमांक ६६३२२ कलम २७९ , ३०४ अ भांदवि आर डब्लु १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या