आर्दश हायस्कुल व आयडियल.प्रा.शाळा येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान तारसा चौक रायनगर येथील आदर्श हायस्कुल व आयडियल कां.हि.प्रा.शाळेत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव भरत सावळे आणि प्रमुख अतिथि आदर्श हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सी.एन.मेश्राम आणि आयडियल कां.हि.प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी विद्यार्थांनी विविध प्रकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू शी संबंधित कविता व कथेचे वाचन केले असुन संस्था सचिव भरत सावळे , मुख्याध्यापिका सी.एन.मेश्राम , सुनिता देशमुख यांनी आपल्या भाषणातुन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चिरित्र्यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिक्षक , शिक्षिकांनी आणि विद्यार्थांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती बालक दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशांत वैद्य यांनी केले तर आभार रेणुका वर्मा यांनी केले .
कार्यक्रमात सर्व शिक्षक , शिक्षिका आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या