Advertisement

नागभिड शिवनगर वाशियांना हक्काचे कायम स्वरुपी पट्टे मिळणार

नागभिड शिवनगर वाशियांना हक्काचे कायम स्वरुपी पट्टे मिळणार

आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांंची गाव्ही,

नागभीड: नगर परिषद क्षेत्राअंतर्गत प्रभाग क्र – ४, शिवनगर भागातील अतिक्रमणधारक नागरिकांनी त्यांच्या विविध समस्या व पट्टेवाटप संदर्भात अर्ज सादर केले असता सदर प्रकरणाची त्वरित दखल घेत तहसील कार्यालय नागभीड येथे सर्व अर्जदारा समवेत प्रत्यक्ष जाऊन त्या संदर्भात तहसीलदार मनोहर चौव्हान आणि संबंधित प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. तसेच, सदर सर्व अर्ज व आवश्यक कागदपत्रांसहित निवेदन सादर करून अतिक्रमण धारकांना जलदगतीने पट्टे मिळावेत यासाठी सकारात्मक कार्यवाही करिता मार्गदर्शक सूचना आमदार किर्तीकुमार भागंडीया, चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी दिल्या,

यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, माजी न.प. बांधकाम सभापती सचिन आकुलवार, तालुका महामंत्री सुनील शिवणकर, माजी नगरसेवक शिरीष वानखेडे, भाजपा महिला आघाडी तय मेश्राम, सत्तार भाई, रुपेश डोर्लीकर, अमोल देशमुख, संगीता गोहणे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि  बहुसंख्येनी अतिक्रमणधारक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या