सरपन गोळा करण्यासाठी गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार.!
ब्रम्हपुरी:-सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक:- ५/११/२०२२ ला उघडकीस आली. जगन हिरामण पानसे वय ७५ वर्षे रा. लाखापुर ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील रहिवाशी असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. जगन हा सरपण गोळा करायला जंगलात दिनांक ४/११/२०२२ ला गेला होता. मात्र दिवस निघून गेला जगन घरी परत आला नाहि. त्यामुळे जगनचा शोध लाखापुर गावशेजारील असलेल्या शेत व जंगल परिसरात कुटुंबीयांनी व घर शेजाऱ्यांनी रात्रीचे ७:०० वाजेपर्यंत शोध घेतला मात्र जगणचा कुठेच थांगपत्ता लागेना.! हिच शोधमोहीम दुसऱ्या दिवशी म्हणजे ५/११/२०२२ ला सकाळीं सुरुवात केली असतां जंगलात हिंस्त्र प्राणी यांनी भक्ष केला असावा अशा अवस्थेत जगणचा मृतशरीर आढळला.! लगेच ही माहिती वनविभाग यांना देण्यात आली.
काही वेळातच वनविभागाची चमू घटनास्थळी धाव घेतली व उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय मध्ये नेण्यात आले व निष्पन्न झाले की जगनचा मृत्यु हा वाघाने हल्ला केल्याने झाला. तसेच मृतक जगणच्या कुटुंबीयांना २५ हजाराची आथिर्क मदत वनविभागाने दिली. जगणच्या जाण्याने पानसे कुटुंब व गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे. संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबधीत वनविभागाने नरभकक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पानसे कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या