हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे संविधान दिवस थाटात साजरा
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – हिराबाई उच्च प्राथमिक शाळा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक मा.नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर शाळेचे संचालक मा.नरेंद्र वाघमारे यांनी संविधान दिवस वर विद्यार्थांना मार्गदर्शन केले . तसेच मुख्याध्यापक मॅडम यांनी संविधानाची वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु. आयेशा अंसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा गायधने यांनी मानले .
या प्रसंगी हेमंत वंजारी, अभिषेक मोहनकर , गीता वंजारी, जयश्री पवार, मंदाकिनी रंगारी , हेमंत वाघमारे ,गणेश रामापुरे सह आदि नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या