Advertisement

सुरगाणा येथे 22 लाभार्थ्यावर शस्त्रकिया

सुरगाणा येथे 22 लाभार्थ्यावर शस्त्रकिया, तर

वाढदिवसा निमित्त फळे व बिस्कीट वाटप

सुरगाणा /नाशिक:- दि. 5/11/2022 रोजी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत हर्निया -2, हायड्रोशील-4, फायमोसिस -15, अशा एकूण -22 लाभार्थ्यांवर विविध आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल सर, भूल तज्ज्ञ डॉ. शारदा गावित, डॉ. चव्हाण, डॉ. संजय चौधरी या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नाशिक येथून उपस्थित झालेली होती. तर सदर कॅम्प यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रविण पवार, डॉ. दिपीका महाले, डॉ. योगिता जोपळे, डॉ. माधुरी गावित, डॉ.सुनयना पवार, डॉ. श्रीकांत कोल्हे,अधीपरिचारिका क्रिस्तीना स्टाफ, सुमित बर्वे,प्रमोद ब्रदर, स्वाती राऊत,हेमंत बागुल, गौरव सोनवणे, जयेश मोरे, परिचारिका हिरा केंग, जयवंती चौधरी, बेबी महाले, बेबी चव्हाण, शिपाई कामडी मामा व सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात, भगवान आहेर तसेच सचिन आहेर यांनी परिश्रम घेतले. तसेच सुरगाणा शहराचे प्रभाग क्र.12 चे नगरसेवक मा.श्री.भगवान आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आली.

किशोर जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या