भाजप चे नरेंद्र बंधाटे यांची उपसभापती पदी निवड
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नुकत्याच शनिवार १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या रामटेक विधानसभेतील रामटेक पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भाजप चे रामटेक तालुका अध्यक्ष व पंचायत समिति सदस्य नरेंद्र बंधाटे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल भाजपा ओबीसी आघाडीचे नागपूर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क कार्यालय, कन्हान येथे शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा रामटेक तालुका महामंत्री राजेश जयस्वाल , भाजप कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , महामंत्री सुनिल लाडेकर , चरण यादव , बालचंद बादुले , सौरभ पोटभरे सह आदि भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .


0 टिप्पण्या