से.नि.मुख्याध्यापक भास्कर नाकतोडे यांचे दुःखद निधन
रेणुका माता वार्ड ब्रम्हपुरी येथील से.नि. मुख्यध्यापक भास्करराव सोनबाजी नाकतोडे(60)यांचे दुःखद निधन झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले.ते शांत, संयमी, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. स्मशानभूमीत भूतींनाला ब्रम्हपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या प्रच्यात्य पत्नी, चार मुली असा आप्त परिवार होता. भास्कर नाकतोडे त्याच्या अंत्यसंस्कार प्रसंगी प्रभाकर पिलारे अध्यक्ष अखिल खेडूला कुणबी समाज संघटना नागपूर, वामनराव बेदरे माजी सदस्य जिल्हा परिषद भंडारा, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे सल्लागार तथा केंद्रप्रमुख रातीराम चौधरी, से नी. शिक्षक तलमले, से.नी.मुख्यध्यापक दादाजी राऊत, से. नी. प्राचार्य दिलीप कऱ्हाडे, ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर, नगरसेवक हितेंद्र राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी स्व. भास्करराव नाकतोडे याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. पुढील वाढचालीसाठी व दुःखातून सावरण्यासाठी त्याच्या कुटूंबियाना परमेश्वर बळ देतो अशी प्रभू चरणी प्रार्थना केली. शोकसभेचे संचालन दादाजी राऊत सर यांनी केले.


0 टिप्पण्या