विजयादशमी निमित्त शिवकालीन आखाडा चे शस्त्र पुजन व प्रात्यक्षिक
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडी व्दारे विजयादशमी निमित्य आखाड्यातील शस्त्राचे पुजन करून शस्त्र चालविण्याचे मनमोहक प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांचे मने जिकंली .
सर्वप्रथम वस्ताद मोहन वकलकर यांच्या मार्गदर्शनात परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडी व्दारे विजयादशमी निमित्य टेकाडी गावात आखाड्यातील दांडपट्टाचे व शस्त्राचे विधीवत पुजन करण्यात आले. राज्यस्तरीय १७ वी आष्टी दिवस स्पर्धे मध्ये शिव गल्लीत प्राविण्य मिळवलेल्या आखाडा नऊ शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिव कलेचे सुंदर मनमोहक प्रात्यक्षिक सादर करित सर्व उपस्थितांचे मने जिंकली . या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोहन कवडुजी वकलकर (वस्ताद) , निलेश गाढवे , छकुली वासाडे , अविनाश वकलकर , सुरज इंगोले , निखिल वकलकर , रामु सातपैसे , अंतेश्वर वकलकर , अनिकेत निमजे , मनोहर सातपैसे , प्रविण इंगोले , सह आदि ने महत्वाची कामगिरी बजावली. कार्यक्रमास बहु संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .


0 टिप्पण्या