Advertisement

सुरगाणा तालुक्यात सरपंच पदी तरुणांना संधी

सुरगाणा तालुक्यात सरपंच पदी तरुणांना संधी

सुरगाणा: ता. १७/१०/२०२२तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माकपचे 33, राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, भाजपचे 3, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी 2, अपक्ष 5 याप्रमाणे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये माकपच्या हातून काही ग्रामपंचायत थोडक्यात निसटल्या असल्या तरीही पुन्हा एकदा ग्रामपंचायतींवर माकपचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण १२ फेऱ्या मधून निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल प्रक्रिया देखील शांततेत पार पडली. थेट जनतेमधून सरपंचाची निवड होणार असल्याने नवीन चेहऱ्यांनी संधीचा लाभ घेत सरपंच पदासाठी उभे राहिले आणि निवडून आले. मतदारांनी अनेक नवीन चेहऱ्यांना सरपंच पदासाठी निवड करून संधी दिली आहे. सदस्य पदासाठी देखील अनेक नवीन चेहऱ्यांना मतदारांनी निवडून दिले आहे.

सद्यस्थितीत निकालानंतर पक्षीय बलाबल याप्रमाणे दिसत असले तरी काही अपक्ष उमेदवार हे पक्षाने उमेदवारी न दिल्याने निवडणूक लढवली. यात काही निवडणूक आले आहेत तर काहींचा थोडक्यात पराभव झाला आहे.

प्रतिक्रिया – निवडणुकीचे महत्व जाणून घेत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांनी अंतर्मुख होऊन पराभवाची कारणमीमांसा करावी. तर विजयी उमेदवारांनी मिळालेल्या संधीने जनहिताची कामे ग्रामपंचायत अंतर्गत करावीत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याने तहसिल प्रशासनाचे व पोलिस प्रशासनाचे आभार. —
जे.पी. गावित,
माजी आमदार.

अलंगुण व मोहपाडा ह्या दोन्ही ग्रामपंचायत पुर्ण पणे बिनविरोध झाली होती. तर साजोळे ग्रामपंचायत मधील केवळ सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली होती. आणि भोरमाळ ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली होती.

रोंगाणे ग्रामपंचायतीची फेर मतमोजणी करण्यात आली.

कुकुडणे ग्रामपंचायत मधील सदस्य पदासाठी उमेदवार असलेल्या मगन भुजाड (राष्ट्रवादी काँग्रेस) व शैलेश कानाथ (माकप) या दोघांनाही १९८ अशी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे महेश्वरी भोये या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढली. यात माकपचे शैलेश कानाथ यांना विजयी घोषित करण्यात आले.

माजी सभापती मनीषा महाले ह्या ठाणगाव ग्रामपंचायत मधून सरपंच पदासाठी विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी सभापती सुवर्णा गांगोडे घोडांबे ग्रामपंचायत मध्ये पराभव झाला.

भाजपा तालुकाध्यक्ष व स्विकृत नगरसेवक रमेश थोरात यांच्या पत्नी झंपाताई थोरात ह्या सरपंच पदाच्या उमेदवार भदर ग्रामपंचायत मधून निवडून आल्या आहेत.

ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे यांच्या स्नुषा सुषमा विष्णू गांगुर्डे ह्या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार यांच्या पत्नी अनिता राजू पवार यांनी सरपंच झाल्या आहेत.

बिनविरोध निवडणूक झालेल्या अलंगुण ग्रामपंचायतच्या सरपंच पदी माजी आमदार जे.पी. गावित यांचे चिरंजीव हिरामण गावित यांची निवड झाली आहे.

बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पत्रकार अशोक गवळी विजयी झाले आहेत.

तालुक्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधून सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संजाबाई खंबाईत यांनी विजय प्राप्त केला आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ सुरगाणा तालुका —

सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर मतमोजणी नुसार पक्षीय बलाबल खालील प्रमाणे —

अपक्षांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती

१)खोकरी ,२)हतगड,३)सराड,४)मालगव्हाण,५)उंबरपाडा(दि.)

सेना+भाजप+राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडी

१) मांगधे
२) मनखेड

भारतीय जनता पार्टी
१) जाहुले
२)प्रतापगड
३)भदर
४)अंबोडा

शिव सेना (उध्दव ठाकरे गट)
१) राहुडे
२) डांगराळे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१)हरणटेकडी,२)शिंदे,३) मोहपाडा,४)बोरगाव,५)साजोळे,६) रोकडपाडा,७)वाघधोंड,८)डोल्हारा,९)खुंटविहीर,१०)मांधा,११) कुकूडणे,१२)म्हैसखडक,१३)हेमाडपाडा,१४) हस्ते,१५)रोंघाणे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

१)गोंदुणे
२) रगतविहिर
३)चिंचपाडा(गुही)
४)राशा
५)उंबरठाण
६)काठीपाडा
७)कोठुळा
८)अंबाठा
९)करंजुल
१०)भवानदगड
११)भोरमाळ
१२) अलंगुण
१३)भवाडा
१४)खिर्डी
१५) बेडसे
१६)ठाणगाव
१७)बारे
१८) कळमणे
१९)वरंभे
२०)कुकूडमुंडा
२१)खोबळा
२२) पळसण
२३)पोहाळी
२४)घोडांबे
२५) नागशेवडी
२६) हट्टी
२७)लाडगाव
२८)बुबळी
२९)माणी
३०) चिकाडी
३१)हतरंडी
३२)माळेगाव
३३) बिवळ.

भवाडा जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती
१.पळसण – माकप- रंजना विठ्ठल चौधरी १८१८
२.खोबळा – माकप -पांडू गायकवाड ८८३
३.कुकडमुंडा – माकप- यशवंत वाघमारे ६७७
४.रोंघाणे – राष्ट्रवादी- कावेरी गुबांडे १३९९
५.मनखेड – भाजप,राष्ट्रवादी आघाडी- नर्मदा भोये १००४
६.हेमाडपाडा – राष्ट्रवादी- पुंडलिक घांगळे ६५८
७.ओरंभे – माकप- रंजना चौधरी ५७२
८.मांगधे – भाजप,राष्ट्रवादी आघाडी.भारती भोये ५४०
९.हस्ते – राष्ट्रवादी, पुंडलिक बागुल
१०.जाहुले – भाजप- अनुसया भोये १०२३
११.कळमणे – माकप-पांडूरंग गावित १२९१
१२.बा-हे – माकप- वैशाली गावित १७९१
१३.ठाणगाव – माकप- मनिषा महाले ८५७
१४.बेडसे – माकप-भाऊ भोंडवे ५८४
१५.अंबोडे-भाजप-राजेंदर निकुळे ११६०
१६.खिर्डी – माकप- शिवराम वळवी १०५३
१७.भवाडा – माकप-कुसुम जाधव २६८९

गोंदुणे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती

१.अलंगुण बिनविरोध – माकप – हिरामण गावित ००
२.हतरुंडी – माकप-आनंदा पवार ५८४
३.खोकरी – अपक्ष- काशिनाथ गवळी ८७२
४.भोरमाळ – माकप- हौसाबाई बागुल ४९५
५.भदर – भाजप- झेंपा थोरात २०५८
६.भवानदगड – माकप-धनश्री हाडळ ६००
७.करंजुल – माकप- प्रभाबाई राठोड ३७६
८.अंबाठा – माकप- हरी चौरे ६१८
९.खुंटविहिर – राष्ट्रवादी- आनंदा झिरवाळ १२६४
१०.डोल्हारे – राष्ट्रवादी-राजेंदर गावित ७४७
११.कोठुळा – माकप- काजल गुबांडे ३२१
१२.काठीपाडा – माकप- रोहिणी वाघेरे १६८७
१३.म्हैसखडक – राष्ट्रवादी- संगिता देशमुख ७९४
१४.उंबरठाण – माकप- गिरीश गायकवाड १५०७
१५.राशा – माकप-सिताराम भोये ६६६
१६.चिंचपाडा – माकप- रेखा चौधरी ७२०
१७.मांधा – राष्ट्रवादी- मिरा महाले
१८.रगतविहिर – माकप-कमल भोये ७३९
१९.कुकूडणे – राष्ट्रवादी- मजित चौधरी ६१२
२०.गोंदुणे – माकप- संजना खंबायत २३२७

हट्टी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती

१.हतगड – अपक्ष- देविदास दळवी ७६९
२.साजोळे – बिनविरोध राष्ट्रवादी- काशिराम गायकवाड ००
३.पोहाळी – माकप- सुनिता दळवी २८६
४.बोरगाव-राष्ट्वादी- अशोक गवळी ७४२
५.घोडांबे – माकप- माया गांगुर्डे ४२१
६.नागशेवडी – माकप- भारती बागुल ३७७
७.मोहपाडा बिनविरोध- राष्ट्रवादी- शांता पवार ००
८.शिंदे – राष्ट्रवादी- पुंडलिक पवार ३०७
९.हरणटेकडी-राष्ट्रवादी-कौशल्य चव्हाण ५१०
१०.डांगराळे – शिवसेना ठाकरे गट. रतन गावित ३८४
११.राहुडे – शिवसेना ठाकरे गट. सुषमा गांगुर्डे ६१३
१२.सराड- अपक्ष- नामदेव भोये ३९६
१३.उंबरपाडा(दि)-अपक्ष- चिमण पवार ४८६
१४.हट्टी – माकप-सुशिला गायकवाड १९४०
१५.लाडगाव – माकप- संजिवनी चौधरी ९१८
१६.बुबळी – माकप- मनोहर राऊत २९०
१७.वाघधोंड-राष्ट्रवादी- रंजना देशमुख ५७२
१८.मालगव्हाण – अपक्ष- योगेश ठाकरे ९७०
१९.प्रतापगड – भाजप- वनिता दळवी ६९६
२०.रोकडपाडा – राष्ट्रवादी- अनिता पवार ६७१
२१.चिकाडी – माकप-सदू बागुल ५००
२२.माळेगाव – माकप-अनिता गवळी १०२०
२३.बिवळ – माकप- हेमलता भुसारे ३८९
२४.माणी – माकप- कमळा चौधरी १०५७
या प्रमाणे सुरगाणा
माकप ३३,
शिवसेना ठाकरे गट २,
भाजप ४,
राष्टवादी १५,
भाजप व राष्ट्रवादी आघाडी २,
अपक्ष ५
अशा ६१ ग्रामपंचायत ीत पक्षीय बलाबल आहे

प्रतिनिधी: किशोर जाधव, सुरगाणा-नासिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या