Advertisement

संत गाडगेबाबा यांची दशसूत्र फलक मंत्रालयात लावण्याची मागणी

संत गाडगेबाबा यांची दशसूत्र फलक मंत्रालयात लावण्याची मागणी

संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने मंत्रालय इमारतीचा तळमजलावर संत गाडगेबाबा यांचे दशसूत्र कार्यक्रम सोबत लावलेले चित्र, शिंदे – फडणवीस सरकारने काढल्याने राज्यातील सर्व संत गाडगेबाबा विचार प्रेमीचे भावना दुखावल्या . त्यामुळे नागरिका मध्ये सरकार विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाला आहे. संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती नागपूर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून संत गाडगेबाबा यांची दशसूत्र फलक मंत्रालयाच्या तळमजल्यावर  लावण्याची मागणी केली.

अन्यथा राज्यातील संपूर्ण गाडगेबाबा विचार प्रेमी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनिल शिंदे , सचिव सचिन शाहाकार , जिल्हाध्यक्ष डोमा क्षिरसागर ,
सचिव विनोद गवळी , युवा जिल्हाध्यक्ष पंकज नांदूरकर , हनुमंतजी क्षिरसागर , अभिजित आंबूलकर , नंदकिशोर केकतपुरे , धीरज ढवळे , दशरथजी घोंगळे , मंगेशजी घोंगळे , अमिते क्षिरसागर , साहिल भोयर , मचरण  क्षिरसागर , एकनाथजी उमक , अमोल उमक सह आदि नागरिक उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या