कन्हान नदी काठावर प्रशासना द्वारे छठ उत्सवाची तयारी जोरात
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – उत्तर भारतीय नागरिकांचा साजऱ्या केल्या जाणाऱ्या छठ उत्सवा निमित्त कन्हान नदीच्या काठावर छठ व्रतांसह स्थानिक प्रशासनाकडून वेद्या बांधण्यात आल्या आहेत. कन्हान नदीच्या काठावर पूर्वी प्रमाणेच यंदाही छठ उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
कन्हान नदीच्या बीकेसीपी शाळा घाटावर आणि कन्हान नदी च्या काठावरील घाट क्रमांक 4 येथे कन्हान – पिपरी नगर परिषद सह कांद्री ग्रामपंचायत व वेकोलि व्यवस्थापनाकडून जेसीबी मशीन व पोकलेन मशीनसह ट्रॅक्टर आदिं च्या मदतीने पार्किंग आदि बाबत गेल्या दोन दिवसांपासून स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी कन्हान नदीला दोन ते तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जेथे पूर आल्याने बरीचशी जमीन हालचाल करण्यास योग्य नसली तरी नदीचे पाणी खूप खोल असल्याने यंदा भाविकांसह पोलिस प्रशासनाने मोठ्या दक्षतेने या कार्यक्रमाला यशस्वी होण्याची जबाबदारी कामगिरी करावी लागेल .
कन्हान नदीच्या काठावर स्थानिक प्रशासनाकडून वीज , वाहतूक आदी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे . छठ उत्सवाच्या कन्हान नदीत सुरू झालेल्या तयारी संदर्भात कांद्री ग्रामपंचाय सरपंच बलवंत पडोळे यांनी नदीवर जाऊन तयारीचा आढावा घेतला .
या प्रसंगी कांद्री ग्रा.प.सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , माजी ग्रा.प.सदस्य अजय सिंह , माजी ग्रा.प.सदस्य वीरेंद्र सिंह , माजी ग्रा.पं.सदस्य विष्णू राऊत , जयप्रकाश वर्मा , जितेंद्र पांडे , अजित तिवारी आदि ने उपस्थिती लावली होती.


0 टिप्पण्या