ब्युटी सेमिनार, ब्रायडल कॉम्पिटिशन, मॉडेल फॅशन शो व मेहंदी कॉम्पिटिशन स्पर्धा संपन्न
रुद्रा फाउंडेशन, तृप्ती मेकअप स्टुडिओ व ब्युटी डे टू डे यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ऑक्टोंबरला नेवजाबाई हितकारणी कॉलेज हॉल ब्रह्मपुरी येथे एक दिवसीय ब्युटी सेमिनार, ब्युटी कॉम्पिटिशन मॉडल हंट फॅशन शो व मेहंदी कॉम्पिटिशन शो चा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रीतीश बुरले, प्रमुख अतिथी रूपाली बाळबुद्धे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नागपूर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती मेश्राम संचालिका तृप्ती’ज मेकअप स्टुडिओ ब्रह्मपुरी यांनी केले. प्रास्ताविक मध्ये सांगितले की, कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचे उद्देश म्हणजे, ग्रामीण भागातील मुली व महिला यांनी मेकअप क्षेत्रामध्ये काम करून आर्थिक दर्जा उंचवावा. आजच्या मेकअप व कटिंग क्षेत्राला फार मोठी मागनी आहे.
ग्रामीण भाग असो किंवा शहरी खूप डिमांड आहे. बारशाच्या कार्यक्रमापासून तर लग्नाच्या कार्यक्रमापर्यंत मेकअप हे प्रत्येक जण करीत असतात. टीव्ही इंडस्ट्रीज, फिल्म इंडस्ट्रीज, राजकीय क्षेत्र इत्यादी प्रामुख्याने मेकअपच्या कामाला सुद्धा फार मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातील महिलांनी व मुलींनी समोर येऊन मेकअप क्षेत्रात काम करावे हाच कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे सांगितले. कार्यक्रमात नामांकित मेकअप आर्टिस्ट व हेअर आर्टिस्ट यांनी आपल्या कामाबाबत उपस्थित प्रेक्षकांना मॉडेल वरती प्रात्याषिक करून दाखवले.
प्रामुख्याने हेअर आर्टिस्ट राज श्रीवास रायपुर, यांनी आधुनिक हेअर कटचे प्रात्याषिक प्रेक्षकांना दाखविले. तसेच वृषाली कडू यांनी ऍडव्हान्स हेअर स्टाईल याबाबतचे प्रात्याशिक प्रेक्षकांना करून दाखविले. मेकअप आर्टिस्ट म्हणून मीनाक्षी कुमार प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, बल्लारशहा यांनी अतिशय सुंदर मेकअप बाबत माहिती देऊन प्रॉडक्ट नॉलेज व मेकअप टेक्निक याबाबत सुंदर मार्गदर्शन केले व मॉडेल वरती प्रात्याषिक करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अंजली भांदककर यांनी मेकअपचे प्रात्याषिक दाखविले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मनस्वी, मिस जूनियर भोपाल 2017 व नामांकित मेकअप आर्टिस्ट व हेअर आर्टिस्ट यांच्या उपस्थितीत स्पर्धकांचे परीक्षण केल्या गेले.
मुख्यतः या कार्यक्रमात तीन प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन, मॉडेल हंट कॉम्पिटिशन व मेहंदी कॉम्पिटिशन या तिन्ही स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
उत्कृष्ट मेकअप प्रथम क्रमांक मोहिनी कन्नाके अर्जुनी मोरगाव, द्वितीय क्रमांक वैशाली ठाकरे नागपूर तर तृतीय क्रमांक पल्लवी मातुरकर ब्रह्मपुरी यांना देण्यात आले. मॉडल हंट कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक सार्थता ललित करंडे ब्रह्मपुरी, द्वितीय क्रमांक निखिल पारधी ब्रह्मपुरी तर तृतीय क्रमांक गौरी टिकले ब्रह्मपुरी यांना देण्यात आले. मेहंदी कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक पल्लवी नाकाडे महागाव तर द्वितीय क्रमांक प्रवीण ऊके पिंपळगाव खांबी यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदीप मारोटकर (संस्थापक) ऑरेंज सिटी ब्युटी डे टू डे नागपूर, राज श्रीनिवास हेअर आर्टिस्ट गुरू रायपूर, वृषाली कडू प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नागपूर, होते. कार्यक्रमाचे संचालन तृप्ती मेश्राम संचालिका तृप्ती मेकअप स्टुडिओ ब्रह्मपुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन माणिक मेश्राम संचालक रुद्र फाउंडेशन अर्जुनी मोरगाव यांनी केले. कार्यक्रमात बॅकस्टेज मेकअप आर्टिस्ट यांनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट कामाचं सादरीकरण प्रेक्षकांना दाखविले रेखा मारगाये, अस्मिता खाडे ,मीरा मुरकुटे, रोहिणी नंदेश्वर, पूजा पाठक, यांनी आपल्या मॉडेल वरती मेकअपचे सुंदर प्रात्यक्षिक करून या कार्यक्रमाची शोभा वाढविली . कार्यक्रम नामांकित मेकअप व हेअर आर्टिस्ट यांच्या उपस्थितीत पार पडले…..
0 टिप्पण्या