धम्मभूमी येथे धम्मदेसना कार्यक्रम संपन्न
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभ पर्वावर धम्मप्रचार केंद्र ब्रम्हपुरी च्या वतीने विजयादशमी, अश्विन पौर्णिमा, वर्ष्यावास व १४ ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दहादिवसीय धम्मदेसना बौद्ध उपासक उपासिका यांना देण्यात आली. धम्मप्रचार केंद्राचे अध्यक्ष डॉ प्रेमलाल मेश्राम यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर मोलाचे प्रबोधन करून भगवान बुद्धांच्या जीवनावर उपासक उपासिकां ची लेखी परीक्षा घेण्यात आली. जवळ जवळ परीक्षेसाठी पन्नास परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तीन महिलांनी १०० टक्के गुण मिळविले तर दोन महिलांनी ९८ टक्के गुण मिळविले तर उर्वरित सर्व परीक्षार्थी यांनी ९० टक्के गुण घेऊन बुद्धांचा संदेश जनमाणसापर्यंत पोहचविण्याचा कार्य केला गेला. या सर्व महिलांना प्रोत्साहनपर बक्षिस देऊन प्रमाणपत्र देण्यात आले. धम्मदेसना देतांना धम्माची शिदोरी घरी घेऊन जा व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करा असा मोलाचा संदेश डॉ प्रेमलाल यांनी सर्व उपासक व उपसिकांना दिला. या तीन दिवसीय धम्मदेसना कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उपासकांना भोजनदान व अल्पोपहार देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मा. वंदना इलमकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्रतिभा डांगे यांनी केले, तर आभार निशा बनकर यांनी मानले. हे दहा दिवसीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले. तर सामाजिक कार्यकर्ते लिलाधर वंजारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या धम्मदेसना कार्यक्रमाला शहरांतील व ग्रामीण परिसरातील असंख्य उपासक व उपासिका तसेच बाल गोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या