देशासाठी भारत जोडो यात्रे मध्ये मोठया संख्येने सहभागी व्हा सुरज मेश्राम
ब्रम्हपुरी:- आज आपला देश कठीण परिस्थितीतुन जात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या व अपयशी धोरणामुळे देशातील गोरगरीब जनता,शेतकरी,युवक यांच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. देश सेवा करण्यासाठी व आपल्या देशाला तानाशाही सरकार पासून वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा असे प्रतिपादन युवा नेते व ब्रम्हपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज मेश्राम यांनी केले.आज देशात महागाई इतकी वाढली आहे जनतेला रोजचा खर्च भागविणे देखील अशक्य झाले आहे. गॅस सिलिंडर जवळपास तिप्पट महाग झाले असून कुटुंबांनी ते भरणेच बंद केले आहे. आदिवासी, गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाने स्वयंपाकासाठी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलिकडे वळवला आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढली आहे.त्या प्रमाणात जनतेचे उत्पन्न वाढले नाही.रोजची कसरत करत ते जीवन व्यथित करत आहे. ग्रामीण भागासह शहरी,निमशहरी भागात देखील काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक सुरू झाला आहे. ही सर्व परिस्थिती भयानक असून या घटकाला कुठलाही दिलासा केंद्रातील भाजप सरकारकडून मिळताना दिसत नाही.ते देतील असा विश्वास देखील आता राहिला नाही.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारत जोडो यात्रेत सामान्य जनता मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.
भारत जोडो यात्रा मुळे देशातील गरीब, वंचित व युवकांना आणि सामान्य लोकांना एक नवीन आशेचा किरण मिळालं आहे.म्हणून आपण सर्वांनी देश सेवा करण्यासाठी व या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला आपले योगदान देऊन जास्तीत जास्त संख्येने समर्थन देऊन भारत जोडो यात्रा व यात्रेचे महत्व जनसामान्यपर्यंत पोहचवावे असे आवाहन ब्रम्हपुरी युवक काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या