Advertisement

पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्याची दंगल

पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्याची दंगल.

दंगलीची परंपरा कायम: ठेवत युवकात आनंदाचे वातावरण.

ब्रम्हपुरी:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्री. गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग व्यायाम मंडळ पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमोद चिमुरकर माजी जी. प. सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपक उराडे, उपाध्यक्ष म्हणून खेमराज तिडके, प्रमुख अतिथी महेश भर्रे नगर सेवक, अनंता उरकुडे, विनोद झोडगे, अविनाश राऊत, गोवर्धन दोनाडकर पत्रकार, प्राचार्य डी. के .मेश्राम, बंटी श्रीवास्तव, विनोद दिवटे, धोंगडे, संदीप राऊत, डाकराम ठाकरे, सोमेश्वर उपासे, शत्रुघ्न भर्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. सन १९६५ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पेठ वार्ड येथे भेट दिली .त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापने पासून आजतागत त्यांच्या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते. हे आयोजन करीत असताना मंडळाचे प्रेरणास्थान स्व. विठ्ठलराव राऊत, स्व. प्रा.किशोर हजारे यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून दगलीची परंपरा कायम ठेवली. पुढील काळात प्राचार्य गंगाधरजी पिलारे , दिगंबरजी कुथे, सोमेश्वरजी उपासे आदी मंडळींनी मोठ्या उत्साहाने दगलीचा सोहळा आयोजीत करीत आले. त्यानंतर त्या काळात जय बजरंग व्यायाम मंडळ यांची धुरा युवक नेतृत्वाकडे आली त्यात प्रकाश कुथे, ओमसागर उरकुडे , लोकेशजी भरदे, सुभाषजी उपासे इत्यादी युवक मंडळींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कठीण परिश्रम घेतले आणि आता त्यांच्याही पुढे जाऊन पेठवार्ड येथील तिसरी पिढी यात कुणाल भगत, प्रदीप उरकुडे, परिमल उरकुडे, विशाल राऊत, विकास ठाकरे इत्यादी मंडळी दीपावलीच्या दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करत पेठवार्ड येथील ५७ वर्षापासून चालू असलेली परंपरा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण मल्लांचा योग्य सन्मान करून यशस्वीरित्या पार पाडत असतात असे मत प्रास्ताविक मध्ये संदीप राऊत यांनी व्यक्त केले.
भव्य कुस्त्यांच्या दंगलीत तीन-चार जिल्ह्यातील कुस्तीगार उपस्थित होते. सदर सामना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू मात्र सरावा करिता क्रीडांगणाची सोय नाही.

ब्रम्हपुरी तालुका हा क्रीडाक्षेत्रात नावाजलेला असून कुस्तीचे अनके उत्कृष्ट खेळाडू असून यात मुल आणि मुली सुद्धा आहेत त्यांनी कुस्तीमध्ये अनेक मेडल मिळवली आहेत, ब्रम्हपुरीच नाव उंचावलेला आहे. जिथे जागा उपलब्ध होईल तिथे ही मुल प्रॅक्टिस करत असतात . मात्र त्यांना खेळण्यासाठी अद्यापपर्यंत एकही हक्काच क्रीडांगण उपलब्ध झाले नाही.
या खेळाडूंनी शासन-प्रशासनाला अनेक निवेदन देऊन सुद्धा त्यांची मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही किंव्हा यांच्या मागणी कडे कोणत्याही लोकप्रतिनीधींकडून जाणीव पूर्वक कुणीही लक्ष दिलेल नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या