Advertisement

धर्मराज प्राथमिक शाळेत डीपीटी लसीकरण मोहीम

धर्मराज प्राथमिक शाळेत डीपीटी लसीकरण मोहीम

लसीकरणाने विद्यार्थीना कवच कुंडले

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – परिसरतील धर्मराज प्राथमिक शाळेत शुक्रवार (दि. ७) ला वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर यांच्या अध्यक्षतेखाली डीपीटी लसीकरण करण्यात आले.

घटसर्प , डांग्या खोकला , धनुर्वात या आजारा पासुन बालकांचे संरक्षण होऊन या लसीकरणाने विद्यार्थ्यांना कवच कुंडले बहाल व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या वतीने डॉ शशांक राठोड यांच्या मार्गदर्शनात अधिपरिचारीका सौ माधुरी राऊत (लुटे) यांच्या हस्ते वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांचे टिटी चे लसीकरण करण्यात आले .

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.धनंजय कापसीकर , मुख्याध्यापक मा.खिमेश बढिये , मा.भिमराव शिंदेमेश्राम , मा. किशोर जिभकाटे , कु.पूजा धांडे , सौ.वैशाली कोहळे , मा.राजु भस्मे , कु. हर्षकला चौधरी , कु अर्पणा बावनकुळे , सौ सुनीता मनगटे , सौ मंदा मुद्देवार , सौ सुलोचना झाडे आदि ने प्रामुख्याने उपस्थित राहुन लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या