स्थागुशा पोलीसांनी कन्हान चोरीचे मुद्देमाल जप्त व दोन आरोपी पकडुन ३ गुन्हे उघडकीस केले
कारवाई दरम्यान अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथका ने कन्हान पोलीस स्टेशन परिसरातुन चोरीच्या गुन्हयात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यांनी ३ गुन्हयातील चोरी करून विद्युत अल्युमिनियन तार कन्हान च्या कबाडी व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने दोन्ही आरोपीस पकडुन चोरीचा अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले .

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक आरोपी शोध व जुगार रेड कामी फिरत असतांना मिळलेल्या गुप्त माहिती व्दारे स्थानिय गुन्हे शाखा पथकाने पोलीस स्टेशन कन्हान परिसरातुन चोरीच्या गुन्हयात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यानी पोस्टे कन्हान हदीतील मौजा बोरी सिंगोरी , केरडी , शिवारात एम एस ई बी चे पोल वरील अल्युमिनियम चे तार खोलुन चोरी केल्याचे कबुल करून चोरीचा संपुर्ण तार कन्हान च्या एका कबाडी व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने कबाडी व्यवसायीक यांचे ताब्यातील तिन्ही गुन्हाचे चोरीच गेलेला अल्युमिनियम तार एकुण किंमत ७७ , ००० रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) हरिष रामसिंग गौतम वय १९ वर्ष व २) प्रफुल्ल सिध्दु धुर्वे वय २२ वर्ष दोन्ही राह. खदान नंबर.४ यांना अटक करून विचारपुस केल्याने त्याने कबुल केले की पोस्टे कन्हान येथे दाखल गुन्हा १) अप क्र१६६/२२ , २) अप क्र २१०/२२ , ३) अप क्र. ३९४/ २२ च्या कलम ३७९, ४२७ भादंवि आर / डब्लु १३६ महाराष्ट्र विद्युत कायदा अन्वये दाखल असुन त्यातील मुद्देमाल जप्त करून पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन करण्यात आले .
कन्हान पोलीस स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लुटमार व चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्या करिता स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली .
सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलिस अधीक्षक मा.विजयकुमार मगर , अप्पर पोलिस अधीक्षक मा.राहुल माखनिकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे यांचा आदेशानुसार स्वत:पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , पोहवा अरविंद भगत , पोना शैलेश यादव , वीरेंद्र नरड , मुकेश शुक्ला , प्रणय बनाफर , नाना राऊत सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.


0 टिप्पण्या