पंचर च्या दुकानातुन ३२ हजार रुपयांचा सेटअप अज्ञात चोरट्याने केला चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान – कन्हान परिसरातील नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर असलेल्या एम.एच.के.एस पेट्रोल पंप वराडा येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यांने पंचर च्या दुकानातुन ३२ हजार रुपयांचा सेटअप चोरी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी हमीद युसुफ अंसारी वय २६ वर्ष रा.वराडा , कन्हान यांची एम.एच.के.एस पेट्रोल पंप वराडा नेशनल हाईवे क्रमांक सात येथे खुल्या जागेत पंचर ची दुकान असुन वर्ष २०१९ मध्ये हमीद अंसारी यांनी दुकाना क्रिया पंचर ची मशीन , हिरव्या रंगाची किलोस्कर कंपनी ची टाकी , कामप्रेशर , इंजन आणि नट खोलण्याची मशीन पाईप सोबत असा पुर्ण सेट अप विकत घेतले आणि युसुफ अंसारी यांनी पंचर चा पुर्ण सेट अप आपल्या पंचर च्या दुकाना समोर फिट केले होते .
युसुफ अंसारी हे दररोज सकाळी ७ वाजता पंचर ची दुकान खोलुन सायंकाळी ७:३० वाजता बंद करुन घरी जातात . युसुफ अंसारी हे शनिवार दिनांक १ आॅक्टोंबर ला सायंकाळी ७:३० वाजता आपल्या पंचर ची दुकान बंद करुन घरी गेले . दुसऱ्या दिवशी रविवार २ आॅक्टोंबर ला युसुफ अंसारी हे सकाळी ७ वाजता च्या दरम्यान पंचर च्या दुकानात आले असता त्यांचा दुकाना च्या बाहेर ठेवलेली हिरव्या रंगाची किलोस्कर कंपनी ची टाकी , कामप्रेशर , इंजन आणि नट खोलण्याची मशीन असा पुर्ण सेट अप किंमत ३२,००० रुपय कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी युसुफ अंसारी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्रमांक ५७०/२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर



0 टिप्पण्या