Advertisement

अल्पवयीन आदिवासी मुलीच्या मारहाण प्रकरणात ब्रम्हपुरीत जण आक्रोश मोर्चा

अल्पवयीन आदिवासी मुलीच्या मारहाण प्रकरणात ब्रम्हपुरीत जण आक्रोश मोर्चा

तालुक्यातील भुज येथील विजयादशमी कार्यक्रमातील घटनेने आदिवासी समाज आक्रमक

ब्रम्हपुरी :-अतिदुर्गम व तालुका मुख्यालयापासून लांब असलेल्या भुज येथे दिनाक ५ ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी रावण दहन आणी रावण पूजन कार्यक्रमा दरम्यान गावातील दोन गटात झालेल्या शुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले व त्यात भुज येथील अल्पवयीन आदिवासी मुलीला झालेल्या जबर गंभीर मारहाणीने प्रकरण चिघडले व पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली व आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकवटला असून आरोपीला अटक करा व कलमात वाढ करा, आदिवासी वरील अत्याचार थांबवा अश्या विविध मागण्यांकरिता ब्रम्हपुरी शहरात आदिवासी समाज व विविध संघटनेच्या वतीने आज मंगळवारी असंख्य आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आदिवासींचे हक्क आणि त्यांचा स्वीकार यात विरोधाभास आहे..! जो ‘अन्याय’ या नुसत्या शब्दाने समजू शकत नाही तर त्याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. तालुक्यातील दुर्गम गाव”भुज”या गावात विविध समाज एकत्र राहतात विजयादशमी सणाला काही समाज बांधव रावण दहणाची परंपरा जोपसतात तर काही रावण पूजनाची, गावातील सलोखा टिकून राहावा व त्योहाराला कसलाही गालबोट लागू नये म्हणून दोन्ही पक्षातर्फे पोलीस स्टेशनं येथे अगोदर समजोता सुद्धा झाला होता आणी उभय पक्ष्याच्या समजोत्याने कार्यक्रम पार पडणार असे ठरले होते. मात्र कधीही गावात भांडण तंटा नसलेल्या साध्या भोड्या समाजात पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तैनात असतांना भांडण झाला व त्यात एका अल्पवयीन आदिवासी मुलीला मारहाण झाल्याची तक्रार होतं गावातील पाच लोकांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हाची नोंद झाली.

आपल्या समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या मारहानीच्या विरोधात आदिवासी समाजाने निषेध नोंदवत विविध आदिवासी संघटने मार्फत प्रशासनाला न्याय, हक्काची मागणी करण्यात आली. मात्र न्याय हक्कापासून आदिवासी समाजाला वंचित ठेवण्यात येतं असल्याचे समाजाच्या लक्षात येत असल्याने संपूर्ण आजूबाजूच्या क्षेत्रातील आदिवासी समाज एकत्र आला व ब्रम्हपुरी येथे मंगळवार रोजी बहुसंख्य समाजबांधवाच्या उपस्थितीत मोठा जण आक्रोश मोर्चा करण्यात आला.
……………………………………………………………………..

मोर्च्यात अखेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आरोपींना अटक करून न्याय मिळाला पाहिजे या न्यायिक मागणीसाठी काढलेल्या मोर्चातील समाज बांधव
तहसिलदार यांना निवेदन देण्यास तहसिल कार्यालयात आले असता तहसिलदार यांनी स्वतः सर्व समाज बांधवांकडून निवेदन स्वीकारावे अशी आग्रही मागणी करण्यात आली असता तहसीलदार यांनी तहसीलच्या पटागणात येऊन स्वतः निवेदन न स्वीकारण्याची भूमिका घेतली त्यामूळे मोर्चेकर्यांनी तहसीलदार जोपर्यंत निवेदन घेतं नाहि तो पर्यंत मोर्चा थामणार नाही ही भुमिका घेतं अखेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी फार मोठ्या प्रमाणात गोंडीयन समाज बांधव उपस्थित होते.

……………………………………………………………………..

पोलिसांची भूमिका संशयास्पद पत्रकार परिषदेत आरोप

पीडित, शोषित आदिवासी समाजातील एका नाबालिक मुलींबाबत घडलेल्या घटनेची ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनाने गांभीर्यपूर्ण दखल घेतली नसल्याने सदर प्रकरण उग्ररूप धारण करीत असल्याचे आदिवासी बांधवांचे आरोप असून आदिवासी बांधवांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, सदर प्रकरणाची तक्रार पोलीस विभागाकडून हेतूपूरस्पर टाळल्या गेल्यानंतर रात्रौ दोन वाजताच्या सुमारास नोंद केल्या गेली मात्र मारहाण झालेली मुलगी अल्पवयीन आदिवासी असतांना तात्काळ अट्रॅसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आली नाही तसेच विविध राजकीय हस्तक्षेपा मुळे तक्रार दाखल करतांना विविध प्रकारे त्रास दिल्या गेला असल्याचे गंभीर आरोप पोलीस प्रशासनावर करीत न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका सुद्धा आदिवासी बांधवानी स्पष्ट केलेली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या