एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत क्रिडा स्पर्धांचे आयोजन
दिनांक 20 ऑक्टोंबरला जनता विद्यालय नागभीड च्या प्रांगणात एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमा अंतर्गत पं. स. नागभीड तर्फे एक दिवशीय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र व ओडिशा राज्यातील सर्वात प्रिय क्रिडा कबड्डी व धावणी यांचा समावेश करण्यात आला. सदर स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने व जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले. या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन पं. स. नागभीडचे गटशिक्षणाधिकारी ए. चिलबूले यांच्या करकमलांनी करण्यात आली. सदर उद्घाटन प्रसंगी विस्तार अधिकारी भेंडारे मॅडम, के. प्र. मंगला कोतकोंडावार मॅडम, के. प्र. मंदे सर, राऊत सर मुख्याध्यापक जनता विद्यालय मुले नागभीड, सातपैसे सर, गजबे सर, जाधव सर, डॅनियल देशमुख सर, मा. भेंडारकर सर, शेख सर, दोईतरे सर, राखडे मॅडम, कु. छाया विंचूरकर -समावेशित तज्ञ, जे. राऊत सर, खापर्डे मॅडम इ. मान्यवर उपस्थित होते तसेच स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या शाळांचे मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कबड्डी व धावणी स्पर्धा इयत्ता 1ते5, इयत्ता 6-8, इयत्ता 9 ते 12 या गटात पार पडली. विजेत्या सर्व संघांना- एकूण 36 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिस गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रेरणास्थान- मा. प्राचार्य.धनंजय चापले ,वरीष्ठ अधिव्याख्याता हिवारे साहेब, अधिव्याख्याता व नागभीड क्षेत्रिय अधिकारी विनोद लवांडे डायट चंद्रपूर होते तर प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी ऎ. चिलबूले होते. सरांनी स्वतः चा अमुल्य वेळ कार्यक्रमाच्या आदीपासून तर अंत्य पर्यंत जिथे न्यूनता होती तिथे पूर्णतः करण्यास दिला. याव्यतिरिक्त के. प्र. कोतकोंडावार मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यास मोलाची मदत केली. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन कु. छाया आर. विंचूरकर यांनी केले. याव्यतिरिक्त खेळात सहभागी विद्यार्थ्यांसोबत शाळांचे शिक्षक, मडावी मॅडम, सहारे सर, बनसोडे सर, समावेशित शिक्षण चमू उपस्थित होते.
सदर शाळेतील मु. अ. एम राऊत सर, पी टी आय मा. सातपैसे सर, सर्व टीचिंग व नाॅन टीचिंग स्टाफ , यांनी छान व्यवस्था व जागा उपलब्ध करून दिली तसेच उपस्थित सर्व शाळेतील शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल सर्वांचे तसेच मा. तालुका वैद्यकीय अधिकारी मडावी यांनी आपली वैद्यकीय चमू उपस्थित ठेवून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे तसेच चुकून सुटलेल्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करते. सदर कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरण व मा. गटशिक्षणाधिकारी चिलबूले यांच्या प्रेरणात्मक शब्दांनी करण्यात आली.
0 टिप्पण्या