तहसील कार्यालयातील जप्त वाहन रात्री आर्थिक हितातून सोडण्याचा मंडळ अधिकाऱ्याचा प्रयत्न नेस्तनाबूत
ब्रम्हपुरी – तहसील कार्यालय ब्रह्मपुरी मध्ये वाळू तस्करी मधील अनेक वाहने जप्त केलेली आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर आणि टिप्पर, ट्रक यांचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुका हा वाळू करिता जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच अवैध वाळू तस्करी करिता सुद्धा प्रसिद्ध आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अवैध वाळू तस्करीबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. मात्र या अवैध वाळू तस्करी मध्ये लिप्त अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने तालुक्यातील अवैध वाळू तस्करी संपण्याचा मार्ग सापडला नाही. मात्र बोटावर मोजण्या इतपत वाहने कोटा रेट म्हणून जप्त करण्यात आलेली आहेत हे विशेष.
या जप्त करण्यात आलेल्या वाहनातील काही वाहन आर्थिक हिताने सोडून देण्याचा प्रयत्न तालुक्यातील एका मंडळ अधिकाऱ्याने 30 सप्टेंबरच्या रात्री करण्याचा प्रयत्न केला. सदर बाब काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी काही पत्रकारांना याबाबत माहिती दिल्याने पत्रकारांनी तहसिल कार्यालयात ज्यांची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत त्यापैकी काही वाहन मालकांना याबाबत सूचना दिली असता त्या वाहन मालकांनी तहसील कार्यालय गाठल्याने या मंडळ अधिकाऱ्याचा आर्थिक हितातून वाहन सोडण्याचा प्रयत्न पूर्णपणे नेस्तनाबूत झाला असून सदर प्रकार तहसिल कार्यालयात असेलल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असेलच.
महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातून राजरोसपणे वाळू तस्करी होत असताना सुद्धा या वाळू तस्करीवर कधीही अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला नाही. यांना शासनाकडून पगार मिळतो, हे पगारी नोकर असताना शासनाने त्यांना दिलेले अधिकार, अधिकारातील त्यांचे कर्तव्य विसरून आर्थिक हितामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतले असल्याची चर्चाही तालुक्यामध्ये जोरदार सुरू आहे.
तर या प्रकरणात काय कारवाही करण्यात येतो याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.


0 टिप्पण्या