Advertisement

कन्हान येथे राजा रावण यांचा हुतात्मा दिवस आणि विरांगणा राणी दुर्गावती यांची जयंती थाटात साजरी

कन्हान येथे राजा रावण यांचा हुतात्मा दिवस आणि विरांगणा राणी दुर्गावती यांची जयंती थाटात साजरी

गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान यादव नगर येथील रहिवासी बंडू ईडपाते यांच्या निवास स्थानी गोंड सम्राट महात्मा राजा रावण यांचा  हुतात्मा दिवस रावण गोंगो व विरांगणा राणी दुर्गावती यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी व नागपुर जिल्हा परिषद सदस्य मा.हरीश उईके यांच्या हस्ते व गोंडवाना गणतंत्र पार्टी उपाध्यक्ष सुखलाल मडावी , गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हाध्यक्ष धनराज मंडावी , गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम , गोंडवाना गणतंत्र पार्टी नागपूर जिल्हा महिला प्रकोष्ठ संघटक सुनिता उईके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजा रावण व विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी राजा रावण व विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेश यादव , कांद्री ग्रामपंचायत सदस्य राहुल टेकाम , गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रामलाल पट्टा , बहुजन समाज पार्टी पारशिवनी तालुका अध्यक्ष राजेंद्र फुलझले , कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष व ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य ऋषभ बावनकर , शहर विकास मंच सचिव सुरज वरखडे , राजेश सायम , निराश कोडवते , बंडू एरपाटे , नामदेव कोडापे , बालचंद भेलावी , शंकर इनवते , संदीप परते , राजेश फुलझाले , अभिजित चांदूरकर , राजकुमार मेश्राम , पप्पू धरणे , अनिलभाऊ पंधराम , राजेश टेकाम , नितीन इरपाते , राजवीर मडावी सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या