सिहोरा येथे कोळसा टालवर कन्हान पोलीसांची धाड
कारवाई दरम्यान एकुण ५९ हजार १२० रुपयांचा १४ टन ७८० किलो कोळसा जप्त
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गच सिहोरा येथे अवैध कोळसा टालावर सोमवारी दुपारी २ वाजता कन्हान पोलिसांनी धाड मारून ५९ हजार १२० रुपये किमंती चा १४ टन ७८० किलो चोरीचा कोळसा पकडुन जप्त करित एका आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला आहे .
नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा मुळे पोलीस बंदोबस्तात असल्याचा फायदा घेत कोळसा माफियाने बिनधास्त दिवस – रात्र कोळशा चोरी सपाटा लावला असल्याने सिहोरा येथील मेडिटेशन सेंटर मध्ये दीक्षा कार्यक्रमाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांना सिहोरा रोडवर असलेल्या जंगली झुडपात अवैधरित्या कोळसा गोळा असल्याची गुप्त माहिती मिळाली. या वर पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ तेथे पोहोचुन अवैध कोळसा टालवर जमा केलेला कोळस्याचा पंचनामा करून वेकोली सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी कोळशा जप्त करून मुद्देमाल वेकोलिच्या ताब्यात दिला. अनेक कोळसा चोरी पकडण्याच्या कार्यवाही नंतर देखील कोळसा चोरी थांबत नसल्याने पोलीसांची तर मुक संम्मती नाही ना अश्या चर्चेला उधाण आले असुन या मुळेच कोळसा माफिया दिवसेन दिवस वाढत असुन पोलिसांना जुमानत नसल्याची नानाविध चर्चा ना पेव फुटले आहे. कन्हान पोलीसांनी अप क्रंमाक ५७२ २२ कलम ३७९ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी क्रिष्णा खडसे ४४ वर्ष राह. विवेकानंद नगर कन्हान विरोधात गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे करित असुन आरोपी चा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या