Advertisement

राशन दुकानदारांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याची मागणी

राशन दुकानदारांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याची मागणी

रास्त भाव दुकानदार संघटनाचे तहसीलदारांना निवेदन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शहरात आणि परिसरातील राशन दुकानदारांचा विविध समस्या मागिल अनेक दिवसा पासुन वाढल्याने राशनकार्ड धारकांना आणि दुकानदारांना अडी अडचणीचा त्रास सहन करावा लागत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटना च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन एक निवेदन पत्र देऊन तात्काळ राशन दुकानदारांच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे.

निवेदनात सांगितले कि पीओएस मशीन सॉफ्ट वेयर चेंज झाले असुन एकाच व्यक्तीला धान्य दायचे असेल तर दोन वेळा थम द्यावे लागत असुन रेगुलर एक वेळ व फ्री एक वेळ द्यावे लागत असल्याने राशन दुकानदारांना आणि कार्ड धारकांना (ग्राहकांना) अडी अडचणीचा सामाना करावा लागत आहे. अगोदर दोन्ही मालाची एकच पावती निघत होती. ठेकेदार दुकानात माल उशीरा पाठवत असल्याने राशन दुकान दारांना वाटप करतांनी भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. मागील डिसेंबर २०२१ पासुन पीएम.के. वाय चे कमीशन दुकानदारांना आता पर्यंत मिळाले नाही. अश्या अनेक समस्या बाबत रास्त भाव दुकानदार संघटना च्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मा.रूपेश बोंदरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन पत्र देऊन तात्काळ राशन दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे . यावेळी तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी सर्व अडचणी वर तोडगा काढुन डी. एस. ओ साहेबांशी बोलुन दुकानदारांचे समाधान केले असुन चार महिन्याचे कमीशन येत्या तीन ते चार दिवसात काढुन देण्याचे आश्वासन दिले .

या प्रसंगी रास्त भाव दुकानदार संघटना अध्यक्ष रूपेश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर , सचिव गजेंद्र सावरकर , रंजना मेश्राम , एम.व्ही. वर्धन , मिना चौधरी , चि.मा.ढोबळे , सुषमा सोमकुवर , सुचना चहांदे , रजनी वानखेडे , सुर्यभान झोडावने , विजय जैन , बापुराव दिवटे , वैभव काळे , सह दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या