भाजपा द्वारे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , नप माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . त्यानंतर संताजी नगर येथे त्रिशरन बुद्ध बिहार परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , कामेश्वर शर्मा , नप गटनेता राजेंद्र शेंदरे , महेंद्र साबरे , महेंद्र चव्हान , संजय रंगारी , सुनिल लाडेकर , शिवाजी चकोले , नगरसेविका अनिता पाटील , सुषमा मस्के , मयुर माटे , रवि महाकाळकर , धर्मेंद्र गणवीर , सचिन वासनिक , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .



0 टिप्पण्या