म.गांधी चौकातील युवकांच्या परिश्रमाणे नवरात्री उत्सव जोपासतोय सामाजिक बांधिलकी
शहरातील कुर्झा वार्डातील विविधांगी उपक्रमाने युवकांचे सर्वत्र कौतुक
ब्रम्हपुरी -आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्त्वपूर्ण सण,अनेक हिंदू सण आणि उत्साहा पैकी नवरात्री या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा वार्डातील महात्मा गांधी चौकात दरवर्षी साजरा होणारा नवरात्री उत्सव या वर्षात तिथे युवकांच्या पुढाकाराणे होणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाणे खास आकर्षणाचा केंद्र बिंदू म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
गणपती उत्सवानंतर भक्तांना देवीच्या आगमनाचे वेध लागले ब्रम्हपुरीमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्री महोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र घटस्थापना सोमवार २६ सप्टेंबरला झाली. तेव्हापासून नऊ दिवस मोठ्या भक्तीभावात देवीची पूजा करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर कुर्झा वार्डातील म. गांधी चौकात आबालवृद्ध व युवकांनी यंदा देवीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्याचे ठरवले व त्या नुसार तयारीला सुरुवात झाली स्वच्छता, रंगरंगोटी आदी कामे जोमात झाले त्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसात नियोजनबद्ध दैनंदिन कार्यक्रमाची एक सूची तयार करण्यात येऊन दैनंदिनी संपूर्ण शहरात वितरित करण्यात आली ज्यात भजन, गायन, चालता बोलता प्रश्न मंजुषा, आनंद मेला, वादविवाद स्पर्धा (विषय- मोबाईल तारक की मारक) ग्रामसफाई, वृक्षादिंडी, चित्रकला, बचाव स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुरभी कला इत्यादी विविधांगी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवरात्री उत्सवादरम्यान नऊ दिवस उत्साहात आयोजन करण्यात येत आहेत
जय बाल दुर्गा मंडळ म.गांधी चौक कुरझा येथे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देतं नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असून सर्वत्र शहराची स्वच्छता करून इतरही लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे प्लास्टिक निर्मूलन,वृक्ष रोपण आणि संगोपन इत्यादी विविध कार्यक्रमाने येथील युवक जनजागृती करीत असल्याने संपूर्ण शहरात येथील युवकांचे मोठे कौतुक होतं आहे.


0 टिप्पण्या