Advertisement

पांधन रोड च्या हनुमान मंदिरातुन गधा व अगरबत्तीचे पात्र चोरी करणारा आरोपी अटक

पांधन रोड च्या हनुमान मंदिरातुन गधा व अगरबत्तीचे पात्र चोरी करणारा आरोपी अटक

संदीपची विवेक बुध्दी जागृत होत चोरलेला पितळेचा गधा व अगरबत्ती पात्र स्वत परत केले

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – परिसरातील पांधन रोड वरील हनुमान मंदिरातुन पितळेचा गधा व अगरबत्ती लावायचे पितळेचे पात्र संदीप परसराम लक्षणे याने चोरी केले होते . परंतु संदीप विवेक बुद्धी जागृत होताच मंदीरात परत आणुन दिल्याने मंदीर कमेटीने कन्हान पोलीसांना आरोपीस ताब्यात देऊन त्याचा जवळुन पितळेचा गदा व अगरबत्ती लावायचे पितळेचे पात्र अशा एकुण २,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी संदीप लक्षणे यास अटक करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.८) ऑक्टोंबर ला सायंकाळी ६ ते ६.१० वाजता दरम्यान श्री हनुमान मंदीर पांधन रोड कन्हान कमेटीचे श्यामसुंदर हरिराम पिपलवा वय ६५ वर्ष राह.नविन पशुखाद्य भंडार , आंबेडकर चौक कन्हान यांचे सोबत कार्यकर्ता भीमसिंग ठाकुर हे पुजा करण्यास मंदिरात गेले असता श्री हनुमानजी च्या मुर्तीजवळ ठेवलेला पितळेचा गधा व अगबत्ती लावायचे पितळेचे पात्र कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याचे निर्देशनात आल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे फिर्यादी श्यामसुंदर पिपलवा यांनी तक्रार केल्याने पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप. क्र ५८२२२ कलम ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवार (दि.१०) ऑक्टोंबर ला मंदीरात चोरी केल्याचा संदीप लक्षणे ला पश्चाताप होत सद् विवेक बुध्दी जागृत झाल्याने त्याने दुचाकीने येऊन चोरी केलेले सामान परत मंदीरात ठेऊन घाईने निघाल्याने तेथील उपस्थित मंदीर कमेटी च्या लोकांनी थांविण्याचा पर्यंत केला.

परंतु लोकांच्या भितीने पळ काढुन त्याने स्वत कन्हान पोलीस स्टेशन ला पोलीसांच्या स्वाधिन केले असता पोलीस हवालदार जियालाल सहारे यानी आरोपी संदीप परसराम लक्षणे वय ४० वर्ष राह. गहुहिवरा वार्ड क्र. ३ यास ताब्यात घेतले. तेव्हाच फिर्यादी श्यामसुंदर पिपलवा हयानी थानेदार विलास काळे यांना फोनवरून माहीती दिली तेव्हा मंदीरात परत आणुन दिलेले पितळेचा गधा वजन अंदाजे १ किलो किंमत १,५०० रूपये व अगबत्ती लावायचे पितळेचे पात्र किंमत ५०० रूपये असा एकुण किंमत दोन हजार रूपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशन मध्ये मंदीर कमेटीने जमा केल्याने कन्हान पोलीसांनी जप्त करून आरोपी संदीप लक्षणे ची प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे वैद्यकीय तपासणी करून अटके बाबत सुचना त्याची पत्नी सौ रूचिका लक्षणे ला देऊन संदीप लक्षणे ला अटक करून त्याची अंगझडती घेऊन हवालात मध्ये बंद करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार जियालाल सहारे सह आदि पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या