आदर्श शाळेत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचीं जयंती साजरी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – आदर्श हायस्कुल द्वारे भारतीय स्वातंत्र्या चा अमृत महोत्सवा निमित्य महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित विनम्र अभिवादन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य देशात विविध कार्यक्रमाचे आयोजनाने अमृत महोत्सव साजरा करित रविवार (दि.२) ऑक्टोबंर ला आदर्श हायस्कुल कन्हान द्वारे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता देशमुख यांच्या अध्यक्षेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री याच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार माल्यार्पण करित विनम्र अभिवादन करण्यात आले .
या प्रसंगी शैलेश सोलंकी सर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता देशमुख हयानी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जिवन चरित्रावर माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मनोज डोंगरे सर हयानी केले .
कार्यक्रमास आर्दश हायस्कुलचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या