खदान जिल्हा परिषद शाळे जवळुन दगडी कोळसा व मारुती सुजुकी चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर तीन जिल्हा परिषद शाळे जवळुन दोन आरोपींनी दगडी कोळसा व मारुती सुजुकी सह एकुण ६७,४४० रु. मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दि.१० आॅक्टोंबर ला दुपारी सेकंड शिफ्ट ४ ते १२ वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे सेराजुद्दीन मोहम्मदीन अंसारी वय २५ वर्ष खदान नंबर तीन कन्हान हे पेट्रोलिंग ड्यूटी करीत असतांना आरोपी १) नाहीद बाबु सैय्यद वय २७ वर्ष रा.वार्ड क्रमांक चार शिवनगर कांद्री कन्हान २) सोहेल अब्दुल खान वय २१ वर्ष रा. खदान नंबर तीन कन्हान यांनी संगमत करुन एम एच ४०/ सी.डी – ३४३९ क्रमांकाच्या बोलेरो गाडी मधील दगडी कोळसा मारुती सुजुकी ८०० गाडी क्रमांक एम एच ०६/ ए बी ३२२६ या मध्ये ९३० किलो दगडी कोळसा किंमत ७४४० रु. व मारुती सुजुकी किंमत ६०,००० रु असा एकुण ६७,४४० रुपयांचा मुद्देमाल दोन आरोपींनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सेराजुद्दीन मोहम्मदीन अंसारी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी १) नाहीद बाबु सैय्यद , २) सोहेल अब्दुल खान यांचा विरुद्ध अप क्र ५९०/२२ कलम ३७९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


0 टिप्पण्या