रखडलेल्या मनरेगा,घरकुल,पाणी पुरवठा सारख्या विविध योजनांना आमदार आशिष जैस्वाल यांच्या पुढाकारनि मिळाली गती : सरपंच सौ. शुभांगी राजू भोस्कर (आमडी-हिवरी)
आमडी-हिवरी(पारशिवनी):- महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी रोजगार हमी योजना, घरकुल योजना, घनकचरा वेवास्थापन योजना, पाणी पुरवठा योजना, महीला बचत गट योजना व इतर योजनेचे रखडलेली विकास कामे पुर्ण करण्या करीता सरपंच शुभांगी भोस्कर यांनी केली होती,आमदार आशिष जयस्वाल (रामटेक विधानसभा) यांना सहकार्याची मागणी.
आमदार आशिष जयस्वाल (रामटेक विधानसभा) व गट विकास अधीकारी जाधव यांच्या सहकार्यांनी विविध योजनांना मिळाली गती.
दिनांक २०/१०/२०२२ ला संबंधित पंचायत समिती अधीकारी व कर्मचारी यांना ग्रा.प.आमडी ला पाठऊन रखडलेल्या विकास कामांना गती देतांना ग्रामसेवक तायवाडे, घरकुल विभाग मनोहर जाधव, मनरेगा अधिकारी ए पी ओ देशमुख, कामडे,राऊत तसेच तालुका संगनक अधीकारी सौरब पवनीकर, बचत गट अधीकरी संदेशजी, स्वच्छता विभाग देवा साहेब प्रामुख्यानी उपस्तीथ होते.
सरपंच सौ. शुभांगी राजू भोस्कर (आमडी-हिवरी) यांनी आमदार आशिष जैस्वाल यांचे आभार मानून समस्त नागरीकांन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हाहन केले व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या