आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या मार्गदर्शनात म.गा.रा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत नागभीड तालुक्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या मार्गदर्शनात व संतोष रडके भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या शुभहस्ते आज म.गा.रा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत नागभीड तालुक्यातील कोर्धा,पारडी ठवरे, मिंडाळा, वासाळा मेंढा,बोंड,देवपायली येथे अनेक विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. भूमिपूजन झालेल्या ग्रामवासीय जनतेच्या वतीने विविध विकासकार्याबद्दल आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचे मनापासून आभार मानले.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, धनराज बावनकर जिल्हा परिषद प्रमुख पारडी बाळापूर,हेमंत नन्नावरे भाजयुमो शहर अध्यक्ष, कु.उज्वला माटे म.आ.महामंत्री, गीताताई बोरकर म.आ.महामंत्री, विजय खोब्रागडे,अरूण गायधने, वासुदेव जिवतोडे,रामकृष्ण नीकुरे, हरिदास नवघडे, रेखाबाई चोधरी,विलास चौधरी,रतीराम ठवरे,संजय सारये,विनोद हजारे मिंडाळा,अशोकजी समर्थ मिंडाळा,नितेश कुर्झेकार वासाळा मेंढा,जगदीश पाटील राऊत बोंड, राजेश्वर गुरपुडे देवपायली, श्रावण जीवतोडे,संदीप गिऱ्हेपुंजे,अक्षय बडगे,आनंद भरडकर, व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या