Advertisement

अखेर तब्बल ०९ बकऱ्या फस्त करणारा अजगर पकडण्यास यश

अखेर तब्बल ०९ बकऱ्या फस्त करणारा अजगर पकडण्यास यश!

राहुल भोयर ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर

ब्रम्हपुरी- तालुक्यातील उचली गावात गेल्या १ वर्षा पासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. अनेकांना गावालगत शेतशिवरात एक महाकाय अजगर सतत दिसायचा या अजगराने एक-एक करता गावातील तब्बल ०९ बकऱ्या फस्त केल्या. अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे,तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते.

दिनांक ०८ ऑक्टोंबर रोजी मिनाक्षी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली.सदर माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गायझेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज वठे यांना देण्यात आली.माहिती मिळताच सर्पमित्र व जीवतज्ञ ललित उरकुडे,विवेक राखडे चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र अंधार व नाल्याची बाजू असल्याने सुरक्षित पणे अजगराला पकडण्यास अडचण होत होती तरीसुद्धा मोठ्या शिताफीने अजगारास पडण्यात आले. महाकाय अजगर जेर बंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

हा अजगर एकूण १२ फूट लांबीचा होता.या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. अजगराला वनपरिक्षेत्र सहाय्यक श्री. सेमस्कर साहेब,वनरक्षक श्री. संभाजी बळदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे गुप्त स्थळी सोडून देण्यात आले.या बचाव कार्यात क्रिष्णा धोटे व गावचे पोलीस पाटील संघर्ष जगझापे यांचे विशेष सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या